Ajit Pawar Absent Manoj Jarange Sabha : मनोज जरांगेंच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या अनुपस्थितीची चर्चा

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर सरकारच्या कामांच्या श्रेयामध्ये अजून एक वाटेकरी वाढला. मात्र, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात दोन्ही उपमुख्यमंत्री सक्रिय दिसले नाहीत...
Devendra fadnavis, Manoj Jarange,  Ajit Pawar,
Devendra fadnavis, Manoj Jarange, Ajit Pawar, sarkarnama

Mumbai : राज्य सरकारने अखेर 'जीआर' काढून मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या. हा 'जीआर' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशीमधील जाहीर सभेत मनोज जरांगे यांच्याकडे सुपूर्द केला. तसेच जरांगे यांचे उपोषण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सोडण्यात आले. मात्र, या विजयी सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पवार, फडणवीस अनुपस्थित का? याची चर्चादेखील आंदोलकांमध्ये होत होती.

Devendra fadnavis, Manoj Jarange,  Ajit Pawar,
Manoj Jarange Speech On Maratha Reservation : 'विजयी गुलालाचा अपमान होणार नाही...'; जरांगेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार!

मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुंबईच्या वेशीवर असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकत्र यावे आणि तोडगा काढावा, असे आपण शेवटचे आवाहन करीत असल्याचे म्हटले होते. पण मराठा आरक्षणावर अजित पवार ठोस भूमिका घेत नसल्याने अजित पवारांच्या ताफ्याला मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले होते. Ajit Pawar Absent Manoj Jarange Sabha

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आंदोलकांकडून देवेंद्र फडणवीस यांनादेखील टार्गेट करण्यात आले होते. अंतरवाली सराटीच्या पहिल्या आंदोलनानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत टीका केली होती. मनोज जरांगे यानी अंतरवाली सराटीमध्ये उपोषण केल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेथे आले. तेव्हादेखील त्यांच्या हस्तेच जरांगे यांचे उपोषण सोडवण्यात आले होते.

एकनाथ शिंदेंचे 'वजन' वाढले

महायुतीच्या सरकारच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस सगळे निर्णय घेत असल्याचे चित्र होते. त्यानंतर अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर सरकारच्या कामांच्या श्रेयामध्ये अजून एक वाटेकरी वाढला. मात्र, मराठा आरक्षणाच्या प्रश्न सोडवण्यात दोन्ही उपमुख्यमंत्री सक्रिय दिसले नाहीत.

छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत आरक्षण देणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आणि आता वाशीमधील सभेत 'जीआर' मनोज जरांगे यांच्याकडे सुपूर्द करीत आपण शब्द पाळणारे नेते आहोत, असे सांगितले. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडवला असल्याचा संदेश गेला आहे. या सगळ्या घडामोडींमुळे एकनाथ शिंदे यांचे राजकीय वजन चांगलेच वाढले आहे.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com