devendra fadnavis | narendra modi | eknath shinde | ajit pawar
devendra fadnavis | narendra modi | eknath shinde | ajit pawar sarkarnama
मुंबई

Video Modi 3.0 Cabinet : अजित पवार गटासह शिंदेसेनेला केंद्रात मिळणार 'कॅबिनेट' मंत्रिपद, पण कधी?

Akshay Sabale

Maharashtra Politics : मोदी 3.0 सरकारमध्ये 'एनडीए'तील 72 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल (Prafull Patel) यांचं नाव निश्चित झालं होतं. पण, त्यांना स्वतंत्र प्रभार असलेलं राज्यमंत्रिपद देऊ केलं. त्यामुळे पटेल यांचा शपथविधी लांबणीवर पडला.

दुसरीकडे शिंदे गटाचे सात खासदार निवडून आले असताना प्रतापराव जाधव यांना स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्रिपदच दिले गेले. त्यानंतर 'कॅबिनेट' मंत्रिपदाची अपेक्षा असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह शिंदेंच्या शिवसेनेत (Shiv Sena) नाराजीचा सूर उमटला आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेसह अजित पवार गटाला 'कॅबिनेट' मंत्रिपद दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दुसरीकडे शिंदे गटाचे सात खासदार निवडून आले असताना प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांना स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्रिपदच दिले गेले. त्यानंतर 'कॅबिनेट' मंत्रिपदाची अपेक्षा असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीचा सूर उमटला आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेसह अजित पवार गटाला 'कॅबिनेट' मंत्रिपद दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील 'एनडीए' सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यावर मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. त्यानंतर तुमच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, मंत्रिपदे दिली जातील, आणखी काही मंत्रालयेही देण्यात येतील, असं मित्रपक्षांना सांगण्यात येत आहे.

त्यामुळे प्रफुल पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपदासाठी 100 दिवसांची वाट पहावी लागणार आहे. त्यासह शिंदेंच्या शिवसेनेला आणखी एक मंत्रिपद मिळू शकते. तर, प्रतापराव जाधव यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागू शकते.

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी 100 दिवसांचं दिलेलं आश्वासन मित्रपक्षांनी मान्य केल्याचं सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात नितीश कुमार यांच्या जनता दल ( युनायटेड) आणि तेलगू देसम पक्षाला (टीडीपी) आणखी दोन केंद्रीय मंत्रिपदे मिळू शकतात.

'मोदी 3.0' सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर आणखी काही पक्ष 'एनडीए'त सामील होऊ शकतात. त्यात ओडिशातील नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाचाही समावेश असण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT