Ajit Pawar News :  Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar News : 'तुम तो धोखेबाज हो...' ; अजितदादांचा जुना व्हिडीओ ट्विट; शरद पवार गटाने डिवचलं!

Chetan Zadpe

Mumabi News : जानेवारी महिन्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूटप्रकरणी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. याचअनुषंगाने आता शरद पवार गटाकडून अजित पवारांचा एक जुना व्हिडीओ प्रसारित केला आहे. या व्हिडीओतून अजित पवारांवर खोचक वार करण्यात आला आहे. यामुळे आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत यावरून वाद-विवाद होण्याची चिन्हे आहेत. (Latest Marathi News)

"दादांची टीका म्हणजे लईच जहरी शब्द!”

अशा कॅप्शनसह अजित पवार यांचा व्हिडीओ शरद पवार गटाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. यातून अजित पवारांच्या जुन्या वक्तव्यातील विसंगती दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. "दादांची टीका म्हणजे लईच जहरी शब्द," या कॅप्शनसह शरद पवार गटाने व्हिडीओ ट्विट करून अजित पवार गटाला डिवचले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ट्विटमध्ये नेमकं काय?

"दादांची टीका म्हणजे लईच जहरी शब्द आणि आज हे 'माजी टीकाकार' मूग गिळून गप्प झालेत, का आणि कशासाठी? दादांनी फक्त शब्दच फिरवला नाही तर साहेबांचा विश्वास तोडलाय! पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास तोडलाय! शब्द जपून वापरायचे असतात आणि लक्षातही ठेवायचे असतात, अशा शब्दांत अजित पवारांना सुनावण्यात आले आहे.

या व्हिडीओमध्ये अजित पवार यांची अनेक जुनी वक्तव्ये आहेत. या व्हिडीओत अजित पवार पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत भाष्य करीत आहेत, तर त्यानंतर सुनील तटकरे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार असे उल्लेख करताना दिसतात.

व्हिडीओच्या शेवटी अजित पवार शिवसेनेबाबत काय म्हणाले होते, याचा थोडासा अंश दाखवण्यात आला. यात अजित पवार म्हणतात, “अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला, तो पक्ष वाढवत नेला, त्यांचाच पक्ष काढून घेतला, त्यांचंच चिन्ह काढून घेतलं.” अशा जुन्या वक्तव्यांना पुन्हा एकदा व्हिडीओच्या माध्यमातून शरद पवार गटाने लोकांसमोर आणले आहे.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT