Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar NCP : निवडणुकीचं वर्ष, अजित पवारांची तयारी जोमात; मोठ्या कार्यक्रमाची घोषणा

Sunil Tatkare : शरद पवार गटाकडून भाषेची पातळी सोडल्याची तटकरेंनी केली टीका

Jui Jadhav

Mumbai Political News : यंदाचं वर्ष हे निवडणुकींचं ठरणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकींसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपच्या पावलावर पाऊल ठेवत मोठ्या इव्हेंटची घोषणा केली. राष्ट्रवादीकडून राजयगडपर्यंत थेट पदयात्रेचे नियोजन काढण्याचे नियोजन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमांची तयार सध्या जोरात सुरू असल्याची माहिती आहे.

पदयात्रेचा कालावधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिवजयंतीनिमित्त पदयात्रा काढली जाणार आहे. स्वराज्य सप्ताहाची सुरुवात 12 फेब्रुवारी रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल आणि मंत्रिगण उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने 'स्वराज्य ज्योत' आणि 'स्वराज्य पताका' शिवकालीन इतिहासाने प्रेरित आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक स्थळावर नेण्यात येणार आहे. या स्वराज्य सप्ताहाचा मार्गही तयार करण्यात आला असून त्या-त्या मुक्कामी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

अशी असणार पदयात्रा

12 फेब्रुवारी रोजी गेटवे ते चेंबूर, तिथून पुढे चेंबूर वाशी ठाणे-कल्याण (दुर्गाडी किल्ला) मलंगगड - बदलापूर (मुक्काम), मुरबाड - माळशेज घाट - जुन्नर - शिवनेरी (मुक्काम), शिवनेरी - वडुबुद्रुक - देहू - लालमहल (पुणे) - सिंहगड (मुक्काम), पुरंदर - सातारा (मुक्काम), सातारा - प्रतापगड - पोलादपूर (मुक्काम), पोलादपूर ते रायगड किल्ला (मुक्काम), किल्ले रायगड येथे 19 फेब्रुवारी रोजी समारोप होणार आहे.

या मार्गावर 'स्वराज्य ज्योत' आणि 'स्वराज्य पताका' फिरवली जाणार आहे. ठिकठिकाणी विविध कार्यक्रम होणार असून फ्रंटल विभागाला त्या त्या ठिकाणी जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. जिल्हास्तरावरही 'स्वराज्य सप्ताहा' चे आयोजन करण्यात येणार आहे. एकंदरीतच शिवजयंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजन्मोत्सव हा 'स्वराज्य सप्ताह' म्हणून साजरा केला जाणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शब्दांची पातळी घसरली

राष्ट्रवादी हे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यावर शरद पवार गटाकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. मात्र याचा समाचार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतला आहे. जे टीका करत आहे त्यांची वैचारिक पातळी घसरलेली आहेत, मात्र आता त्यांची पातळी घसरली हे पूर्ण म्हणजे पातळीचा अपमान करण्यासारखा आहे, असा तटकरेंनी समाचार घेतला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT