Ajit Pawar  Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar News : अजितदादांनी भाजपश्रेष्ठींसमोर जाणं पुन्हा टाळलं; जीएसटी काउन्सिलसाठी केसरकर दिल्लीला रवाना

GST Council Meeting : अजित पवार यांनी तीन वेळा भाजपश्रेष्ठींसमोर जाण्याचे टाळले आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीला जाणे पुन्हा एकदा टाळले आहे. दिल्लीत आज (ता. ७ ऑक्टोबर) वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विभागाच्या बैठकीला जाण्याऐवजी अजितदादांनी नाशिक दौऱ्यावर जाणे पसंत केले आहे. त्यामुळे ते भाजपश्रेष्ठींवर नाराज तर नाहीत ना, अशी चर्चा रंगली आहे. (Ajitdada avoided going to Delhi again; Deepak Kesarkar left for Delhi)

दरम्यान, दिल्लीत आज होणाऱ्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीला अर्थमंत्री अजित पवार यांच्याऐवजी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे जाणार आहेत. ते बैठकीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.

दिल्लीत आज जीएसटी काउन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीला देशातील सर्व राज्यांचे अर्थमंत्री उपस्थित राहतात. मात्र, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे आज होणाऱ्या बैठकीला जाणार नाहीत. ते नाशिक दौऱ्यावर आहेत. पवार यांच्याऐवजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे बैठकीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसांपूर्वी दिल्लीला गेले होते. वास्तविक त्यांच्यासोबत अजित पवारही जाणार होते. मात्र, ते दिल्लीला गेले नव्हते. ते आजारी असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे शिंदे-फडणवीस या दोघांनीच दिल्लीचा दौरा केला होता.

तत्पूर्वी गणेशोत्सवात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत लालबागच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळीही उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर आले होते. म्हणजेच अजित पवार यांनी तीन वेळा भाजपश्रेष्ठींसमोर जाण्याचे टाळले आहे. त्यातच पालकमंत्रिपदाच्या वाटपावरूनही अजित पवार हे आग्रही होते. मात्र, वाटप होत नसल्याने ते नाराज होते, अशी चर्चा आहे.

अजित पवार गट हा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी प्रचंड आग्रही आहे. मात्र, या दोन्ही जिल्ह्यांसाठी शिंदे गटाचाही आक्रमक दावा आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद राखून ठेवण्यात आलेले आहे. पुण्याचे पालकमंत्रिपद मात्र अजित पवार यांना देण्यात आलेले आहे. मात्र, तेच अजित पवार आज दिल्लीला जाण्याऐवजी नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे होणाऱ्या पक्षाच्या मेळाव्यासाठी दाखल झाले आहेत.

एकंदरीतच मंत्रिपद, पालकमंत्री मिळालेले असतानाही अजितदादांचा भाजपवर अजूनही रुसवा का आहे, असा प्रश्न चर्चिला जात आहे. काही असले तरी अजित पवारांनी तिसऱ्यांदा भाजपश्रेष्ठींना टाळल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT