Mumbai, 15 December : महायुती सरकारचा आज (ता. 15 डिसेंबर) नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्या विस्तारात भाजपचे वीस, शिवसेनेचे बारा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. महायुतीच्या मंत्र्यांमध्ये अनेक विद्यमान मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीची धक्कादायक नावे येण्याची शक्यता आहे. अजित पवारही विद्यमान पाच मंत्र्यांना डच्चू देणार असून त्यांच्या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना पसंती मिळण्याची शक्यता आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) नऊ प्लस एक अशी दहा मंत्रिपदे मिळणार आहेत. मागील निवडणुकीप्रमाणे या वेळीही अजित पवार सोडून राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ मंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती आहे. यामध्ये आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसन मुश्रीफ, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील, नरहरी झिरवाळ, दत्तात्रेय भरणे, इंद्रनील नाईक याशिवाय सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे या आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेला आहे.
विद्यमान मंत्र्यांपैकी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धर्मरावबाबा आत्राम, अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांचा पत्ता मंत्रिमंडळातून कट करण्यात आलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही धक्कादायक नावे मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता आहे. आता छगन भुजबळ यांना का डावलण्यात आले, याची चर्चा सुरू झाली आहे.
मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर नागपूरमध्ये होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विदर्भ विभागाच्या मेळाव्याकडे छगन भुजबळ यांनी पाठ फिरवली आहे, त्यामुळे भुजबळ हे नाराज असल्याची माहिती आहे. दुसरीकडे धर्मरावबाबा आत्राम यांनी मात्र अजित पवार यांचा निर्णय मान्य केला आहे. आता आमचे वय झाले आहे, त्यामुळे पक्षाने नव्या रक्ताला संधी देण्याचे धोरण स्वीकारले आहे, त्यामुळे पक्षाने घेतलल्या निर्णयावर आम्ही नाराज नाही, असे आत्राम यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, वळसे पाटील यांना संधी मिळणार नसल्याने त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यातून दत्तात्रेय भरणे, तर लातूरमध्ये संजय बनसोडे यांच्याऐवजी बाबासाहेब देशमुख यांना संधी दिली जाणार आहे. नाशिकमध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याऐवजी सिन्नरचे आमदार माकिणराव कोकाटे यांची नावे मंत्रिपदासाठी घेण्यात आलेली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.