Sanjay Raut : PM मोदींच्या दबावामुळे माजी सरन्यायाधीशांनी निर्णय दिला नाही; राऊतांकडून चंद्रचूड यांच्याबाबत 'ही' मोठी मागणी

ShivSenaUBT party Sanjay Raut former Supreme Court Chief Justice Dhananjaya Chandrachud disqualify MLA PM Narendra Modi : आमदार अपात्रतेच्या निर्णय देऊ न शकलेले माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दबावाखाली होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
Sanjay Raut 3
Sanjay Raut 3Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर मोठा आरोप करत खळबळ उडवून दिली.

"सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावाखाली आमदार अपात्रतेचा निर्णय दिला नाही. चंद्रचूड यांच्यावर खटला दाखल केला पाहिजे", अशी मागणी राऊत यांनी केली.

शिवसेनायुबीटी पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना, भाजप महायुतीवर (Mahayuti) जोरदार टीका केली. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर गंभीर आरोप करत, त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्याची मागणी केली.

Sanjay Raut 3
Maharashtra Cabinet Extension : विखेंचा मंत्रिमंडळात समावेश निश्चितच; महसूल खाते कायम राहणार का?

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "दहाव्या शेड्युलनुसार ज्यापद्धतीने आमदार फोडले, ते अपात्र ठरायला पाहिजे होते. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दबावाखाली तसा निर्णय दिलेला नाही". त्यामुळे चंद्रचूड यांच्यावर खटला दाखल केला पाहिजे. तशी आमची मागणी आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Sanjay Raut 3
Rahul Gandhi : संविधान अन् मनुस्मृतीची प्रत दाखवत राहुल गांधींची भाजपवर टीका; म्हणाले, ' सरकारने युवकांचे अंगठे कापले...'

"पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यापद्धतीने राज्य चालवत आहे, ते संविधानाच्या विरोधात आहे. संविधान देशाचा आधार असून, तो नरेंद्र मोदी उद्धवस्त करत आहेत. मोदी देशाला लाभलेले 65 वर्षांतील असत्य बोलणारे सगळ्या महान पंतप्रधान लाभलेले आहेत. गौतम अदानी नरेंद्र मोदींचीा नवीन संविधानकर्ता आहे ", असा टोला देखील राऊतांनी लगावला.

बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची हिंमत दाखवावी

"इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये आणीबाणी लावली होती. हा निर्णय त्यांनी जाहीरपणे घेतला होता. यात अनेकांना तुरुंगात जावे लागले होते. यातून नरेंद्र मोदी यांनी धडा घेतला पाहिजे. नागरिकांचे हक्का संपुष्टात आणताल, तर त्यांचा उद्रेक होईल. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या होत्या. त्यात त्यांचा पराभव झाला. तो त्यांनी स्वीकारला. मोदींनी इंदिरा गांधींप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात", असे आव्हान राऊतांनी मोदींना दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com