Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

State Government News : राज्य सरकारचा ओबीसी समाजासाठी महत्त्वपूर्ण; 'या' विद्यार्थ्यांना होणार मोठा फायदा

Deepak Kulkarni

Mumbai News : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा, धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीनंतर औबीसी समाजही आक्रमक झाला आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, यासाठी मंत्री छगन भुजबळांसह ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. याचदरम्यान, आता राज्य सरकारने ओबीसी समाजासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे 12 कोटी 88 लाख रुपये मंजूर केले आहेत.याचा फायदा सरकारने निवड केलेल्या 34 ओबीसी विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यातील या वर्षी 32 तर मागील वर्षाच्या बॅचमधील 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.परदेशी शिक्षण घेणाऱ्या ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यासाठी सरकारची ही दिवाळी भेट ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ओबीसी(OBC) समाजासाठी इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याबाबत इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले,ओबीसी प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी या शिष्यवृत्तीचा मोठा लाभ होणार आहे.

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना त्यामुळे मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाने याबाबत नुकताच शासन निर्णय जारी केला आहे.राज्यात निर्माण झालेल्या मराठा (Maratha) आणि ओबीसी वाद पेटलेला असतानाच दरम्यानच हा निर्णय घेण्यात आला आहे.

2023-24 या शैक्षणिक सत्रात परदेशी शिष्यवृत्तीसाठी ओबीसींचे 177 अर्ज आले होते.त्यापैकी 175 अर्ज पात्र ठरले.परंतु, केवळ 50 विद्यार्थ्यांचा कोटा असल्याने उर्वरित विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहिले असल्याचे चर्चा होती.

त्यावर मंत्री अतुल सावे (Atul Save) म्हणाले, 75 ओबीसी विद्यार्थ्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. वित्त विभागाकडे प्रस्ताव गेला आहे. परदेशातील विद्यापीठात डिसेंबरपर्यंत प्रवेश घेता येतो. त्यामुळे पुढील वर्षीपासून ओबीसींचे 75 विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकणार असल्याचे सावे यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT