Madhya Pradesh Election 2023 : छिंदवाड्यात 'कमळ' विरुद्ध 'कमल'नाथ मुकाबला रंगणार!

BJP Vs Kamal Nath News : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असून...
Shivraj Singh Chouhan And Kamalnat
Shivraj Singh Chouhan And KamalnatSarkarnama
Published on
Updated on

राजेश चरपे

Chhindwara News : लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. याचदरम्यान आता मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत.या निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहेत.या निवडणुकांकडे लोकसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. यात मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होत आहे.तसेच ही निवडणूक दोन्ही नेत्यांनी प्रतिष्ठेची केली आहे.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिंदे यांना सोबत घेऊन फारसा फायदा होईल याची जशी भाजपला शाश्वती दिसत नाही, तोच प्रकार येथेही बघायला मिळतो. ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांचाही काही प्रभाव येथे जाणवत नाही. उलट भाजप विरोधात आणखीच असंतोष आहे. काँग्रेसच्या काळात इडी, सीबीआय विविध कॉंग्रेस नेत्यांच्या चौकशीसाठी एकदम सक्रिय होती. भाजपची सत्ता येताच या तपास यंत्रणा अचानक गायब झाल्या आहेत. याचीही नोंद येथील जनतेने घेतली असल्याचे दिसून येते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shivraj Singh Chouhan And Kamalnat
Rushi Sunak : ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रिपदी माजी पंतप्रधानांची निवड; सुनक यांच्या नेतृत्वाखाली करणार काम

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असून येथे कमळविरुद्ध कमलनाथ असा मुकाबला रंगला आहे. काँग्रेसने पुन्हा मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ यांना पुढे केले तर भाजपने तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आणि मामा म्हणून परिचित असलेले शिवराज सिंग यांचा चेहरा पडद्याआड लपवला आहे.

यामुळे भाजपचा मुख्यमंत्री कोण असा संभ्रम निर्माण झाला आहे. याचा मोठा फटका येथे साडेतीन वर्षे सत्तेवर राहिलेल्या भाजपला बसताना दिसत आहे. छिंदवाडा जिल्हा काँग्रेसचा गड समजला जातो.येथील सातही मतदारसंघ मागील निवडणुकीत कॉंग्रेसने जिंकले आहेत. सुमारे पंधरा महिने कमलनाथ मुख्यमंत्री होते. त्यांचे सरकार भाजपने पाडले याचाही रोष जनतेत दिसतो.

भाजपने आपल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात रेवड्या वाटपाच्या भरपूर योजना सुरू केल्या आहेत. ग्रामीण भागात त्याचा निश्चितच फायदा होताना भाजपला दिसत आहे. यात लाडली बेटी, लाडली लक्ष्मी, ज्येष्ठांना पेन्शन, सहावीपासून शिष्यवृत्ती यासारख्या लाभाच्या योजना येथे सुरू आहे.मात्र, हे करीत असताना स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होत नसल्याने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. सत्तेत असताना भाजप नेत्यांची उर्मट वागणूक आणि पैशाचा देखावा जनतेला चांगलाच खूपत आहे.

कमलनाथ यांनी कल्याणकारी योजना बंद केल्याचा प्रचार केला जात आहे. ते मुख्यमंत्री होते. त्यापूर्वी केंद्रीय रस्ते व बांधकाम मंत्री होते. यावरू भाजपचे कार्यकर्ते केंद्रीयमंत्री यांचे काम दाखवून तुम्ही ४० वर्षात काय केले अशी विचारणा करीत आहेत. मात्र काँग्रेसतर्फे योजना बंद केल्या नसून नाव बदल्याचे सांगत आहेत. असे असले तरी प्रचाराच्या बाबतीत भाजप आघाडीवर आहे.

Shivraj Singh Chouhan And Kamalnat
Abdul Sattar News : खासगी दौऱ्यात समीर वानखेडेंनी घेतली मंत्री अब्दुल सत्तारांची भेट...

छिंदवाडा जिल्हा कमलनाथ (Kamal Nath) यांच्याच नावाने ओळखला जातो.आपला माणूस मुख्यमंत्री होणार असल्याने जिल्ह्यातील सातही मतदारसंघात काँग्रेसमध्ये चैतन्य दिसून येत आहे. वेगवेगळ्या एजेंसीचे सर्वे कमलानाथ यांच्यासह पुनः सातही मतदार संघात पुन्हा काँग्रेस जिंकून येणार असल्याचा दावा करीत आहे. यात तथ्य असल्याचे जिल्ह्यात फिरताना दिसते. सौसर विधानसभा मतदार संघात भाजपला मोठी अपेक्षा आहे.

भाजपचे (BJP) उमेदवार नाना मोहड यापूर्वी तीनदा जिंकून आले. मात्र मागील निवडणुकीत त्यांना काँग्रेसचे विजय चौरे यांनी धूळ चारली होती. तेव्हापासून नाना मोहोड चांगलेच सक्रिय आहेत. त्या तुलनेत आमदार असूनही चौरे फारसे फिरकत नसल्याची जनतेत नाराजी आहे. भाजपच्या नेत्यांनी सत्तेचा लाभ मोहोड यांना दिला. थोडे अबोल असलेले चोरे यांचे व्यक्तिमत्त्व मोहोड यांच्या आक्रमक प्रचारात झाकोळले गेले आहे. येथे भाजपला चमत्काराची आशा आहे.

कमलनाथ यांचे जिल्ह्यातील वर्चस्व कमी करण्यासाठी भाजपने पांढूर्णा जिल्ह्याची घोषणा केली. दोन मतदार संघ पांढूर्णा जिल्ह्यात टाकले. मात्र सौसर शहरात यामुळे नाराजी आहे. दुसरीकडे पांढूर्णा मतदार संघात भाजपने सेवानिवृत्त जज प्रकाश उईके यांना उमेवारी दिल्याने पक्षात मोठी नाराजी निर्माण झाली आहे. पदधिकाऱ्यांना थोपवण्यासाठी भाजपला मोठी सर्कस करावी लागत आहे.

Shivraj Singh Chouhan And Kamalnat
Local Body Election News : विकासकामे अन् नियोजनातील सामान्यांचा सहभाग अडकला कोर्टकचेरीच्या कचाट्यात...!

अमरवाडा या आदिवासींसाठी राखीव मतदार संघात भाजपने गोंडवाना गणतंत्र पार्टीतून उमेदवार आयात केला आहे.मोनिका बट्टी यांचे वडील यापूर्वी गोडवांना पार्टीचे आमदार होते. त्यांनी रावणाच्या मूर्तीची स्थापना करुन रामायण जाळले होते.याचा रोष भाजप कार्यकर्त्यांमध्येही दिसून येतो. जुन्नरदेव मतदारसंघात अनेकदा पराभूत उमेदवारावर भाजपने डाव लावला तर परासिया मतदार संघात भाजपला बंडखोरीचा फटका बसण्याचा धोका निर्मणा झाला आहे. एकंदरीत छिंदवाड्याचा गड काँग्रेस पुन्हा सर करेल असे चित्र आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Shivraj Singh Chouhan And Kamalnat
Rushi Sunak : ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रिपदी माजी पंतप्रधानांची निवड; सुनक यांच्या नेतृत्वाखाली करणार काम

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com