MLA Anant Nar, providing a boost to Uddhav Thackeray-led Shiv Sena Sarkarnama
मुंबई

Shivsena UBT : ठाकरेंच्या आमदाराला नडला पण लढायचाच विसरला... आता लाखो रुपये घालवून बसला!

Shivsena UBT News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनंत नर यांच्या विधानसभा सदस्यत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

Hrishikesh Nalagune

Shivsena UBT News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनंत नर यांच्या विधानसभा सदस्यत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच त्यांच्या आमदारकीला आव्हान देणार्‍या रोहण साटोणे यांना तब्बल साडे तीन लाख रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला आहे.

अनंत नर गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या मनीषा वायकर यांचा 1,541 मतांनी पराभव केला. याचिकाकर्ते साटोणे हे अपक्ष उमेदवार होते, 4 जानेवारी रोजी साटोणे यांनी नर यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती.

नर यांच्या आमदारकीला आव्हान देणाऱ्या या याचिकेवर नुकतीच न्या. अभय अहुजा यांच्या एकलपीठासमोर सुनावणी पार पडली. नर यांचे वकील अमित कारंडे यांनी याचिकेतील मूलभूत त्रुटींकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. सुनावणीदरम्यान प्रत्येकवेळी साटोणे यांच्या वतीने वकील अनुपस्थित राहत होते.

या दरम्यान, साटोणे यांनी बदली वकीलही उभा केला नाही. काही ना काही कारण पुढे करून सुनावणीसाठी पुढील तारीख मागत होते. वारंवार असे घडत असल्याचे नर यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे चुकीच्या पद्धतीने याचिका केल्याचे निरीक्षण नोंदवून नर यांनी वकिलांवर केलेल्या खर्चाची परतफेड द्यावी अशी मागणी केली.

याचिकेला उत्तर देण्यासाठी झालेला खर्च परत मिळण्याचा अधिकार आहे, असा दावा करून हा खर्च याचिकाकर्त्यावर लादण्यात यावा, अशी मागणी नर यांच्या वतीने ॲड. कारंडे यांनी न्यायालयाकडे केली. यावर न्यायालयाने याचिकाकर्त्याला साडेतीन लाख रुपये दोन आठवड्यांच्या आत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT