Ajit Pawar, Anil Bornare, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Vs Devendra Fadnavis : महायुतीत होणार बंड? बोरनारेंनी घेतले दोन अर्ज; भाजपच्या भूमिकेकडे लक्ष...

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra MLC Election : लोकसभा निवडणुकीत उमेदवारासाठी महायुतीतील शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात चांगलीच चढाओढ दिसून आली. आता तिच गत विधानपरिषद निवडणुकीनिमित्त पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघानंतर आता मुंबई शिक्षक मतदारसंघातही महायुतीत मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. मुंबई शिक्षकवरून महायुतीत बंडाची होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

लोकसभा होताच राज्यात विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यानुसार कोकण पदवीधन, मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ, तर नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत होताच उमेदवारी जाहीर करण्यासाठी महायुतीत मोठी चढाओढ सुरू झाली आहे.

मुंबई शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार Ajit Pawar गटाकडून शिवाजी नलावडे रिंगणात आहेत. त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतरही भाजपकडून इच्छुक असलेल्या अनिल बोरनरे यांनी दोन उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यांनी एक अर्ज भाजपच्या नावाने तर एक अपक्ष म्हणून नेला आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघात ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेने अभिजित पानसेंची उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपनेही आपला उमेदवार दिला आहे. तेथून सिटिंग आमदार असलेले निरंजन डावखरेंना भाजपने पुन्हा रिंगणात उतरवले. या मतदारसंघातून लढण्यास शिंदे गटही आग्रही आहे. यानंतर आता मुंबई शिक्षक मतदारसंघातूनही महायुतीतील भाजप आणि अजित पवार गट आमनेसामने आले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानपरिषदेसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे. त्याचा निकाल हा 1 जुलै रोजी लागणार आहे. सध्या त्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतून उमेदवारांची चाचणी सुरू आहे. असे असतानाही महायुतीत मात्र प्रत्येक मतदारसंघात उमेदवार देण्याची स्पर्धाच लागल्याचे दिसून येत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT