Sanjay Raut addressing media over the Ashok Kharat case, intensifying the political controversy in Maharashtra. Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : "भोंदूबाबा अशोक खरात हा भाजपचा अधिकृत प्रचारक होता..."

Sanjay Raut Targets BJP on Ashok Kharat case : अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी युती सरकारच्या काळात दीड कोटीचा निधी मंजूर केल्याचा 2018 सालचा जीआर समोर आला आहे. तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी हा निधी मंजूर केल्याचं समोर आलं आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 25 Mar : भोंदूबाबा अशोक खरात हा भाजपचा अधिकृत प्रचारक आहे, अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. अशोक खरात प्रकरणावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे.

एकीकडे खरातला गुरू मानल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर दुसरीकडे खरातसोबतचे अनेक नेत्यांचे फोटो आता समोर यायला सुरूवात झाली आहे.

अशातच अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी युती सरकारच्या काळात दीड कोटीचा निधी मंजूर केल्याचा 2018 सालचा जीआर समोर आला आहे. तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी हा निधी मंजूर केल्याचं समोर आलं आहे.

याच मुद्द्यावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, "अशोक खरात हा भाजपचा प्रचारक होता. भाजप किंवा संघ परिवाराची बुआ, बाबा यांची संघटना बांधायची अशी निती आहे. तशी त्यांची संघटना आहे. त्यांनी वारकरी संप्रदायाला देखील राजकारणात ओढलं आहे. भाजपच या पापाचा सगळ्यात मोठा भागिदार आहे. याचं प्रायश्चित भाजपने घेतलं पाहिजे", असा हल्लाबोल राऊतांनी केला.

तुम्ही गृहमंत्री आहात म्हणून विधानसभेत काहीही वाचून दाखवाल त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. यात आपल्या लोकांचा देखील तितकाच वाटा होता हे जेव्हा मुख्यमंत्री स्वीकारतील तेव्हा त्यांना मी निष्पक्ष काम करतायत असं मी म्हणेन, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना लगावला.

शिवाय खरात प्रकरणातील पीडित महिलांचे फोटो व्हायरल होत आहेत असं याआधी महाराष्ट्रात कधीही झालेलं नाही. आतापर्यंत महिलांची ओळख गुप्त ठेवली जात होती. जप्त केलेले मोबाईल पोलिसांकडे होते, पोलीस खातं देवेंद्र फडणवीसांकडे आहे. देशभरात अनेक बलात्काराचे अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.

कुणाचेही फोटो व्हिडीओ असे उघडपणे समोर आले नाहीत. मात्र, प्रथमच कायद्याच्या बालेकिल्ल्यात म्हणजे नाशिकमध्ये या महिलांचे फोटो समोर येत आहेत याची सरकारला लाज वाटली पाहिजे. या प्रकरणाती तेजस्विनी सातपुते यांनी याची चौकशी केली पाहिजे, असंही राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT