Ashok Kharat Case: भोंदूबाबा खरातचं नाव 'अशोक' नव्हेच समोर आली धक्कादायक माहिती; स्वत:च्या नावातही झोल...

Ashok Kharat Real Name Revealed: अशोक खरातवर आणखी एका पीडितेने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार दिली आहे. त्यामुळे आता खरातवर एकूण सात गुन्हे दाखल झाले आहेत. तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभागृहात खरातबाबत निवेदन दिले.
Ashok Kharat real name controversy
Ashok Kharat real name controversySarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat Real Name: भोंदूबाबा ज्योतिषी आणि स्वत:ला कॅप्टन म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातला महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलीस तपासात खरात संबंधित अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.

अशातच आता खरातबाबतची आणखी एक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे अंकशास्त्रज्ञ म्हणून जो खरात नेत्यांसह सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करत होता. तो खरात चक्क दहावी नापास असल्याचं समोर आलं गणित विषयात नापास झाला होता तरीही तो अंकशास्त्र म्हणून मिरवत असल्याचं आता उघड झालं आहे.

सिन्नर तालुक्यातील कहांडळावडीमध्ये खरात वावी येथील माध्यमिक शाळेत खरात शिकत होता. मिळालेल्या माहितीनुसार, दहावी परीक्षेच्या गुणपत्रिकेनुसार खरातला 35.88% मिळाले होते. तर मराठीत, 39 इंग्रजी 37 गणितामध्ये 28 विज्ञान, 62 समाजशास्त्र 38 आणि हिंदीमध्ये 47 गुण मिळाले होते. आकडेवारीनुसार खरात गणितात नापास असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Ashok Kharat real name controversy
Eknath Shinde : ठाकरेंच्या निरोप समारंभात एकनाथ शिंदे केवळ दोनच वाक्य बोलले; 'उद्धवसाहेब' असा उल्लेख करत म्हणाले...

तर या भोंदू खरातचे आधीचे नाव लक्ष्मण असल्याचं समोर आलं आहे. अशोक खरातचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी (शिवाजीनगर) आहे. तो शिक्षणासाठी वावी येथील माध्यमिक शाळेत जायचा. 1 जून 1965 ची जन्मतारीख असलेल्या अशोक खरात याचे शाळेतील नाव 'लक्ष्मण एकनाथ खरात' असे होते. मात्र, त्यानंतर गॅझेटद्वारे आपले नाव अशोक केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भोंदूबाबा खरातबाबत अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहे.

Ashok Kharat real name controversy
Ashok Kharat case: अशोक खरातचा पाय आणखी खोलात; सातवा गुन्हा दाखल, कोणी केली होती तक्रार

दरम्यान, खरातवर आणखी एका पीडितेने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार दिली आहे. त्यामुळे आता खरातवर एकूण सात गुन्हे दाखल झाले आहेत. तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभागृहात खरातबाबत निवेदन दिले. शिवाय या प्रकरणात अशोक खरातला (Ashok Kharat) ज्यांनी कुणी मदत केली त्या कुणालाही सोडण्यात येणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com