Worli Constituency Election Sarkarnama
मुंबई

Worli Constituency Election : एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराने 500 रुपये देऊन प्रचारासाठी लोकं आणली; 'शिवसेनाUBT'च्या तक्रारीची गंभीर दखल

ShivSenaUBT party complains that ShivSena candidate Milind Deora violated the code of conduct in Mumbai Worli Assembly Constituency : मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार खासदार मिलिंद देवरांविरोधात शिवसेनाUBT पक्षाची निवडणूक आयोगाकडे तक्रार.

Pradeep Pendhare

Mumbai News : मुंबईतील वरळी मतदारसंघातील निवडणुकीकडे राज्यातील सर्वांचेच लक्ष असणार आहे. इथं सामना आहे शिवसेनाविरुद्ध शिवसेना! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंविरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने खासदार मिलिंद देवरा यांना उतवरले आहेत. त्यामुळे इथंल्या प्रत्येक घडामोडीवर राजकारण होणार आहे अन् तसं व्हायला सुरवात झाली आहे.

शिवसेना ठाकरे पक्षाने मिलिंद देवरा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून, त्याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. अधिकाऱ्यांना तक्रारीवर 24 तासांच्या आता कार्यवाही अहवाल सादर करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे.

मुंबईतील वरळी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या शिवसेना पक्षाकडून खासदार मिलिंद देवरा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. काल निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर मतदारसंघात प्रचार शिगेला पोचलाय. दोन्ही गटाकडून एकमेकांच्या राजकीय हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे.

शिंदे यांच्या शिवसेना (Shivsena) पक्षाच्या उमेदवार मिलिंद देवरा यांनी प्रचारासाठी शोभायात्रा काढण्यात आली होती. यासाठी पाचशे रुपये देऊन यात्रेत सहभागी झाल्याचे काही लोकांनी कबुली दिली आहे. हा प्रकार गंभीर असून, त्याची तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे आचार संहितेचा भंग केल्याची तक्रार केली.

निवडणूक आयोगाने देखील या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून, अधिकाऱ्यांना तक्रारीची 24 तासांत दखल घेऊन कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थानिक अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी सुरू केली आहे. या तक्रारीत तथ्य आढळल्यास एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे वरळीतील उमेदवार खासदार मिलिंद देवरा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT