uddhav thackeray sarkarnama
मुंबई

Shivsena UBT Politics : एकाच दिवसात चार दिग्गज ठाकरे गटात, 'मशाल' हाती घेण्यासाठी चढाओढ

Rajan teli Prakash Salunke moreshwar bhondve join Shivsena UBT : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे पक्षप्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये चढाओढ लागली आहे.

Roshan More

Shivsena UBT News : विधानसभा निवडणुकीची घोषणेच्या आधीपासूनच पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जोरदार इन्कमिंग होत आहे. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी पाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेशासाठी रांग लागत आहे. आज (शुक्रवारी) एकाच दिवसात तब्बल चार दिग्गज नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये नारायण राणेंचे कट्टर समर्थक राजन तेली, अजित पवार गटाचे सांगोल्याचे माजी आमदार दिपक साळुंखे पाटील, सिल्लोड विधानसभेतील भाजपचे प्रदेश सचिव सुरेश बनकर, अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पक्षप्रवेशासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ लागली आहे.

राजन तेली यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, 'शिवसेनेत आज पाच पक्षप्रवेश झाले आहेत. चांगले कार्यकर्ते, माणसं शिवसेनेत येत आहेत. राजन जसे आले तसे दिशा बदलून इकडे तिकडे गेलेले ते मोठ्या संख्येने इकडे येत आहेत.राज्यातील वातावरण बदलले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आणणार हे महाराष्ट्रातील जनता ठरवले आहे, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रवेश करणारे संभाव्या उमेदवार?

आज पक्षप्रवेश करणार राजन तेली हे सावंतवाडी मतदारसंघातून, सुरेश बनकर सिल्लोड मतदारसंघातून दीपक साळुंके सांगोला मतदारसंघातीन तर मोरेश्वर भोंडेवे हे चिंचवड मतदारसंघातून उमेदवार असण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT