eknath shinde Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Badlapur political clash: बदलापुरात महायुतीचं 'कुरुक्षेत्र'! एकनाथ शिंदेच्या नगरसेवकांकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला बेदम मारहाण

Mahayuti conflict News : एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत वाद समोर आला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामा ब्युरो

Thane News : बदलापूर शहरात नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीपासून महायुतीमधील भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात या-ना त्या कारणावरून मतभेद घडत आहेत. त्यातच आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत वाद समोर आला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बदलापुरातील वातावरण चांगलेच तापले आहे.

बदलापुरात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपच्या (BJP) नेत्यांमध्ये मोठा राडा झाला असल्याचा प्रकार समोर आला आहे. एका हळदी समारंभाच्या कार्यक्रमात दोन्ही पक्षाचे नेते आमनेसामने आले असून यावेळी ही घटना घडली.

रोहन पाटील, सूरदास पाटील यांच्यासह शिंदे शिवसेनेच्या (Shivsena) काही कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकाऱ्याचा मुलगा सनी पाटील याला मारहाण केली. त्यामुळे महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. सनी पाटील यांचे वडील मारुती पाटील हे पालिका निवडणुकीत नगरसेवक रोहन पाटील यांच्या विरोधात निवडणुकीला उभे होते.

तेव्हापासूनच दोन्ही गटातील वाद विकोपाला गेला होता. दरम्यान, आता एका हळदी समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही गट समोरासमोर आले असता यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले.

यावेळी नगरसेवक रोहन पाटील, माजी नगरसेवक सूरदास पाटील सहकाऱ्यांनी सनी पाटील यांना मारहाण केली, असा आरोप सनी पाटील यांनी केला. तथापि, याप्रकरणी नगरसेवक रोहन पाटील, सूरदास पाटील यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकंदरीतच या घटनेमुळे बदलापुरातील वातावरण चांगलेच तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT