

Marathwada Political News : सध्या महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांमध्ये संघटनात्मक बांधणी, बदलाचे वारे जोरात वाहू लागले आहे. काँग्रेस पक्षाने सृजन संघटन मोहीम सुरू केली आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनेही मराठवाड्यात दौरे करत वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपही या संघटनात्मक कामात अग्रेसर आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी (ता.21 एप्रिल) महाराष्ट्रासह मराठवाड्यातील जिल्हा प्रभारींच्या नावांची यादी जाहीर केली आहे.
मराठवाड्यात नव्या-जुन्यांची सांगड घालत पक्षाने संघटनेत काम करण्याची संधी अनेकांना दिली आहे. ती देताना प्रत्येकाचे कार्यक्षेत्र मात्र बदलेले आहे. प्रत्येकाला इतर जिल्ह्यात जबादारी देण्यात आली आहे, जेणेकरून पारदर्शकपणे काम होईल, असा या मागचा हेतू असल्याचे सांगीतले जाते.
मराठवाड्यातील बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडे यांची लोकसभेची उमेदवारी कापल्यापासून त्या पक्षात सक्रीय नव्हत्या. त्यांच्यावर आता छत्रपती संभाजीनगर पश्चिम या शिवसेनेचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी मंत्री तथा निलंग्याचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना नांदेड शहरची जबाबदारी दिली आहे. तिथे खासदार अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांना काम करावे लागणार आहे.
तर लातूर शहरचे जिल्हा प्रभारी म्हणून माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत बसला होता. जिल्हा प्रभारीच्या माध्यमातून यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न कराड यांच्या नियुक्तीतून झाल्याचे दिसते. लातूर ग्रामीणमध्ये जालना महापालिकेतील नगरसेवक मकरंद पांगारकर यांची जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
लातूरमधील भाजपाच्या नेत्या अर्चना पाटील यांना धाराशिव, आमदार संजय केनेकर यांच्यावर परभणी शहर, खासदार डाॅ. अजित गोपछेडे जालना शहर तर खासदार रामराव वडकुते यांच्याकडे जालना ग्रामीणची जिल्हा प्रभारी म्हणून जबाबदारी असणार आहे. मराठवाड्यात जिल्हा प्रभारी नेमताना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पक्षांतर्ग गटबाजी मोडून काढण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवल्याचे या नुक्त्यावरून स्पष्ट होते
नांदेड शहर-संभाजी पाटील निलंगेकर
नांदेड उत्तर- किरण पाटील
नांदेड दक्षिण- रेखा कुलकर्णी
परभणी शहर- प्रवीण घुगे
परभणी ग्रामीण- संजय केनेकर
हिंगोली- संजय कौडगे
जालना महानगगर- खासदार अजित गोपछेडे
जालना ग्रामीण- खासदार रामराव वडकुते
छत्रपती संभाजीनगर शहर- चैतन्यबापू देशमुख
छत्रपती संभाजीनगर उत्तर- राहुल लोणीकर
छत्रपती संभाजीनगर पश्चिम- प्रीतम मुंडे
बीड-सुनील राणे
लातूर शहर- भागवत कराड
लातूर ग्रामीण-मनोज पांगारकर
धाराशीव- अर्चना पाटील चाकूरकर
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.