

Buldhana News : महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी नेमकी कुणाला संधी दिली जाणार चर्चांना उधाण आलं होतं. राष्ट्रवादीत विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोठी यादी होती. पण महायुतीत एकच जागा वाट्याला आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यासमोर कोणाला उमेदवारी द्यायची याविषयीचा मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर राष्ट्रवादीला नाराजीचा पहिला धक्का बसला आहे.
राष्ट्रवादी पक्षाकडून गुरुवारी(ता.30) विधान परिषदेच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आल्यानंतर काहीच तासांत पक्षाला मोठा धक्का बसला आहे. बुलढाणा जिल्यात तब्बल 90 सामूहिक राजीनामे दिल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
भाजप आणि शिवसेनेचा विरोध डावलून राष्ट्रवादीने झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर केली. सिद्दीकी यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आल्यानंतर आता ठाण्यात नाराजीची ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आनंद परांजपे यांना विधान परिषदेसाठी डावलण्यात आल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.तर दुसरीकडे अमोल मिटकरींनीही इशारा दिला आहे. याचदरम्यान, आता बुलढाण्यातही नाराजीचा भडका उडाला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातील प्रमुख 90 पदाधिकाऱ्यांनी आपला सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांना विधानपरिषद उमेदवारी न मिळाल्यानं या पदाधिकाऱ्यांनी हे राजीनामे दिले आहेत.या सर्व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे आपले राजीनामे सोपवले आहेत.काझी यांच्याकडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाझेर काझी हेही विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक होते. मात्र,त्यांना यावेळीही पक्षाने संधी नाकारली. याच नाराजीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास 90 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिले आहेत.
विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बुलढाण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. परंतु,सामूहिक राजीनाम्यांचा अचानक बॉम्ब पडल्यामुळे तातडीनं राष्ट्रवादीकडून ही बैठक रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री मकरंद पाटील यांच्यासमोरच घोषणाबाजी करत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.