Thane, 22 February : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) चालक आणि वाहकाला कन्नड येत नसल्याच्या कारणावरून कर्नाटकात काळे फासण्याचा प्रकार कन्नडगिंना केला आहे. त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही या प्रकारचा निषेध करताना आम्ही काय हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. उद्या तुमच्याही बसेस आमच्याकडे येतात, असा इशारा त्यांनी केला आहे.
प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले, हा वाद वाढू नये, यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहेत. आमची एसटी बस कर्नाटकात गेल्यानंतर तेथील गावगुंडांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी अडवून चालक आणि वाहकाला मारहाण करून त्यांच्या तोंडाला काळं फासलं. एसटी बसलाही काळं लावण्यात आलं होतं. हे काय बरोबर नाही. उद्या तुमच्याही बसेस आमच्याकडे येतात. आमच्या काही लोकांनी तसं केलं तर मग... प्रवाशांच्या जिवाची काळजी सर्वांना घ्यावी लागणार आहे. चालक-वाहकांना मारहाण करून तुम्हाला काय मिळणार आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा फार पूर्वीपासूनचा आहे. मी शिवसेनेचा (Shivsena) मंत्री आहे. आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी दोन महिने बेळगावमध्ये कारावास भोगला आहे. आम्ही काय हातात बांगड्या भरलेल्या आहेत काय हो. मंत्री वैगेरे नंतर आधी आम्ही शिवसैनिक आहोत. आमच्या लोकांना असा कोणी त्रास देणार असेल. सध्या काय गरज नसतानाही वाद निर्माण केला जात आहे, असेही परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले.
मंत्री सरनाईक म्हणाले, आमच्या परिवहन व्यवस्थापकांना त्या गाव गुंड्याच्या विरोधात तक्रार द्यायला लावली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी पोलिसांना सूचनाही दिलेल्या आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करावी, अशी विनंती मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना करणार आहे.
कन्नडगिंना धडा शिकवायचा म्हटले तर तो कसाही शिकवू शकतो. शिवसेनेची स्थापनाच महाराष्ट्राच्या भल्यासाठी झालेली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे हेच मदत करत असतात. गुंडगिरी करून, चालक-वाहकाला काळं फासून सीमावादाचा प्रश्न सुटणार आहे का. राष्ट्रीय पातळीवर त्याचा निर्णय होणे अपेक्षित आहे. हा प्रकार वारंवार होणार असेलतर महाराष्ट्रातील शिवसैनिक हातात बांगड्या भरून बसलेला नाही, असा इशाराही सरनाईक यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.