Mumbai News : महायुती सरकाराचा मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी सोहळा थोड्याच वेळात सुरू होत आहे. तत्पूर्वी महायुीतमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का बसला आहे.
मंत्रिपदाचे प्रॉमिस पाळले नसल्याने भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघातील आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेते आणि विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी शपथविधी सोहळ्यावेळीच राजीनामा दिल्याने शिवसेनेतील नाराजीनाट्य लपून राहिले नाही.
महाराष्ट्रातील महायुती सरकारचा आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. अधिवेशनाच्या एक दिवसपूर्वी नागपूरमध्ये महायुतीमधील मंत्रिपदाचा शपथविधी थोड्याच वेळात होत आहे. यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील तीनदा आमदार म्हणून निवडून आलेले भंडारा- पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेते व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिलाय.
शिवसेनेचे (Shivsena) आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते. मात्र मंत्रिमंडळात कुठेही स्थान न मिळाल्याने अखेर त्यांनी हा राजीनामा दिला. शपथविधीच्या दिवशीच भोंडेकर यांनी राजीनामा दिल्याने त्यांची नाराजी लपून राहिली नसून, त्यावर चर्चा सुरू झाली आहे. भोंडेकर विधानसभा निवडणुकीत 1 लाख 26 हजार 516 मते घेऊन विजयी झाले आहे.
आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी निवडणूक अपक्ष लढण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. निवडणुकीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी भोंडेकर यांना मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, आता मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे नाराज झालेले भोंडेकर यांनी त्यांच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. भोंडेकर यांच्या आक्रमकपणामुळे शिवसेनेतील नाराजी उघड झाली आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला 11 मंत्रिपदे आली आहेत. यात तीन माजी मंत्र्यांना डिच्चू देण्यात आला आहे. यात दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे. तसंच उदय सांमत, प्रताप सरनाईक, शंभूराज देसाई, योगश कदम, आशिष जैस्वाल, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, दादा भूसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट यांना मंत्रिपदावर संधी मिळाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.