Amit Shah-Bharat Gogawale Sarkarnama
मुंबई

Bharat Gogawale : भरत गोगावलेंची रायगडावर अमित शाहांसोबत चर्चा; म्हणाले, ‘पालकमंत्रिपदाबाबत मी अमितभाईंशी....’

Amit Shah Raigad Tour : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा येत्या एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत सुटेल, असं दिसतंय. रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेकडेच राहायला पाहिजे; म्हणून तर एवढे दिवस हा वाद सुरू आहे. त्यावरच घोडं अडलेलं आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 15 April : छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार होणाऱ्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नुकतेच रायगडावर आले होते. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. त्याचवेळी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावलेही रायगडावर होते. त्यावेळी माझी अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले आहे, त्यामुळे गोगावलेंची अमित शाह यांच्यासोबत काय चर्चा झाली, याची उत्सुकता वाढली आहे.

रोहयो मंत्री भरत गोगावले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) हे परवा रायगडावर आले होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र आले होते. रायगडावरील कार्यक्रमानंतर अमित शाह हे सुतारवाडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी जेवायला गेले. त्यानंतर मी माझ्या मतदारसंघात होतो, त्यामुळे मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करता आलेली नाही. मी आज शिंदे यांना भेटणार आहे, त्या वेळी मी त्यांना अमित शाह यांच्यासोबत काय चर्चा झाली, याबाबत विचारेन. तेवढं मी विचारू शकतो.

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा येत्या एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत सुटेल, असं दिसतंय. रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेकडेच राहायला पाहिजे; म्हणून तर एवढे दिवस हा वाद सुरू आहे. त्यावरच घोडं अडलेलं आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निकाल आमच्या बाजून होईल, अशी आम्हाला खात्री आहे, असेही भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी स्पष्ट केले.

गोगावले म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत माझं वैयक्तिक बोलणं झालं आहे. येत्या ९ जुलै रोजी तिथीप्रमाणे रायगडावर राज्याभिषेक सोहळा होणार आहे. त्या सोहळ्याचं निमंत्रण मी केंद्रीय मंत्री शाह यांना दिलं आहे. आपण आता जसं पुण्यतिथी सोहळ्यासाठी रायगडावर आला आहात, तसं राज्यभिषेक सोहळ्यासाठीही यावे, असं निमंत्रण मी अमित शाह यांना दिले आहे.

रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत अमित शाह यांच्याशी बोलण्याची ती वेळ नव्हती. त्याबाबत मी काहीही बोललो नाही. मी फक्त राज्यभिषेक सोहळ्याचे निमंत्रण दिलं आहे, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले.

कॅबिनेट मंत्री गोगावले म्हणाले, माझ्यावर असणाऱ्या प्रेमापोटी कार्यकर्ते आक्रमकपणे बोलत असतात. भरत गोगावले हे सर्वांना हवेहवेसे वाटत असतात, त्यामुळे माझ्यावरील प्रेमापोटी कार्यकर्ते हे आक्रमक भूमिका मांडत असतात. आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासेाबत काय चर्चा झाली का, असं मी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारणार आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT