Rajendra Raut Warning : राजेंद्र राऊतांचा दिलीप सोपलांना इशारा; ‘अधिकाऱ्यांवर दबाव आणाल तर लक्षात ठेवा सरकार कोणाचे आहे...’

Barshi Aam Sabah News : आमच्याकडूनही काही चुका झाल्या असतील. नाराजी असेल त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आमचा अल्पशा मतांनी पराभव झाला. विरोधकांना काम करताना अडथळा आणायचा नाही, असं ठरवलं होतं. पण, अवघ्या पाच महिन्यांतच जनेतून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
Dilip Sopal-Rajendra Raut
Dilip Sopal-Rajendra Raut Sarkarnama
Published on
Updated on

Barshi, 14 April : बार्शी तालुक्याच्या आमसभेत आमदार दिलीप सोपल यांनी अधिकाऱ्यांना फटकारले होते. जे नियमानुसार काम करणार नाहीत, त्यांची उचलबांगडी निश्चित आहे, असा इशारा आमदार सोपल यांनी आमसभेत बोलताना अधिकाऱ्यांना दिला होता. तसेच, खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही अधिकाऱ्यांना सुनावले होते. त्याला माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी प्रत्युतर दिले आहे. आमसभा घेऊन विरोधकांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणला आहे. मात्र सरकार कोणाचे आहे, हे लक्षात ठेवा, असा इशारा राऊत यांनी सोपल यांना दिला आहे.

बार्शी (Barshi) तालुक्याची आमसभा शनिवारी झाली, त्या सभेत अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला, त्यांना धारेवर धरण्यात आले. आमदार सोपल यांनीही अकिधाऱ्यांना खडसावले. तसेच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कामासाठी पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्यांना इशारा दिला होता. नागरिकांकडूनही विविध प्रश्न विचारून अधिकाऱ्यांना भंडावून सोडले.

माजी आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अधिकाऱ्यांच्या बाजूने आपण ठापणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले. विधासभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मान्य आहे. आमच्याकडूनही काही चुका झाल्या असतील. नाराजी असेल त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आमचा अल्पशा मतांनी पराभव झाला. विरोधकांना काम करताना अडथळा आणायचा नाही, असं ठरवलं होतं. पण, अवघ्या पाच महिन्यांतच जनेतून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

माजी आमदार राऊत म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल पाच महिन्यांनी आमदारांनी आमसभा घेऊन अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ मुंबईत जाऊन मंत्र्यांसोबत फोटोसेशन करणाऱ्या आमदारांनी कोणत्याही प्रकारचा निधी आणलेला नाही. सरकार कोणाचेही आहे, हे लक्षात ठेवा. एकाही अधिकाऱ्याची बदली होऊ देणार नाही, सरकार खंबीरपणे पाठीशी उभे राहिल.

Dilip Sopal-Rajendra Raut
Subhash Deshmukh : सुभाष देशमुखांनी शड्डू ठोकलाच; कल्याणशेट्टींना तासाभरातच उत्तर, ‘भाजप कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढविण्याचा निर्णय’

आमदारकीच्या काळात आम्ही चार हजार कोटी रुपयांचा निधी आणला. कामे वेगात करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. नियोजनाही ते मोठी मदत करतात. त्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून काम होत नसतात. त्यासाठी निधी आणावा लागतो. नाचता येईना, अंगण वाकडं अशी सध्या विरोधकांची अवस्था झाली आहे, असा टोमणाही त्यांनी विरोधकांना लगावला.

आमसभेत त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न विचाारले. बार्शी तालुक्यातील जनतेचे हित पाहणे माझे कर्तव्य आहे. मलही जनतेने मतदान केलेले आहे. उजनी ते बार्शी पाणी पुरवठा योजनेचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे, येत्या मे महिन्यात ते पूर्ण होईल, असा दावाही राऊत यांनी केला.

Dilip Sopal-Rajendra Raut
Barshi Aamsabha : तब्बल 9 तास चालेल्या बार्शीच्या आमसभेत चक्क गुटख्याच्या पुड्या उधळल्या; पोलिसांचा निषेध, अधिकाऱ्यांना धरले धारेवर!!

अधिकारी आणि पदाधिकारी हे विकासाच्या रथाची दोन चाके आहेत. अधिकाऱ्यांना धमक्या देऊन त्रास देणे दुर्दैवी बाहे. विधानसभा निवडणुकीनंतच्या पाच महिन्यांत विरोधकांनी मुरुमाचा खडाही टाकला नाही. आमदारांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावेत किंवा निधी आणावा मग अधिकारी नियोजनबद्ध कामे करतील. विकासाची कामे थांबणार नाहीत. कोणीही त्रास देत असेल तर अधिकाऱ्यांनी मला सांगावे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे, असा शब्दही माजी आमदार राऊत यांनी दिला.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com