Amit Shah News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महायुतीतील नेत्यांना जिंकण्यासाठी दिले 'हे' चार कानमंत्र

Political News : सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीतील नेत्यांना कानमंत्र दिला आहे.
Amit Shaha
Amit Shahasarkarnama
Published on
Updated on

New Dehli News : राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राज्यातील सर्वच पक्षाने जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. महायुती व महाविकास आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. त्यातच सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीतील नेत्यांना कानमंत्र दिला आहे.

जनकल्याण योजना जनतेपर्यंत पोहोचवा, सरकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी महायुतीतील नेत्यांना कानमंत्र दिला. सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे हे जनतेला पटवून सांगा. प्रत्येक उमेदवार महायुतीचा समजून प्रचार करा, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून उमेदवार जिंकेल यासाठीच काम करा, बंडखोरी होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्या, अशा सूचना अमित शाह (Amit Shaha) यांनी महायुतीमधील नेत्यांना दिल्या. (Amit Shaha News)

उमेदवार देताना पक्षीय विचार टाळून विजयी होणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी देण्यावर भर द्या. सर्व उमेदवार महायुतीचे आहेत. पक्ष विचार बाजूला ठेवून उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. प्रचार सभा घेताना तिन्ही नेत्यांनी सगळ्या मतदार संघात सभा घ्या.

त्यासोबतच राज्यातील प्रत्येक मतदारसंघातील उमेदवाराला तुम्ही आपले नेते वाटावेत यासाठी काम करा, असे आवाहन त्यांनी केले. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाच्या नेत्यांनी एकत्रित काम करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या आहेत.

Amit Shaha
MVA News : 'मविआ'च्या जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी चेन्निथला, पवारांची मध्यस्थी

एकत्रित सभांवर भर द्या

आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आहेत. त्यामुळे भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी एकत्रित प्रचार सभा घेण्यावर भर देण्यास हव्या अशा सूचना त्यांनी नेत्यांना दिल्या आहेत.

Amit Shaha
Shivsena UBT Politics : एकाच दिवसात चार दिग्गज ठाकरे गटात, 'मशाल' हाती घेण्यासाठी चढाओढ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com