Bharat Jodo Nyay Yatra Sarkarnama
मुंबई

Congress Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा लवकरच महाराष्ट्रात...

Congress leader Balasaheb Thorat gave the information : राहुल गांधी यांनी सुरू केली आहे. गुजरातनंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Amol Sutar

Mumbai News : देशात काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधी यांनी सुरू केली आहे. ही यात्रा गुजरातनंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करत लवकरच महाराष्ट्रात येणार आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी या यात्रेच्या महाराष्ट्रातील कार्यक्रमाबाबत माहिती दिली आहे. दि. 12 रोजी गुजरातनंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे.

त्यानंतर धुळे, मालेगाव, नाशिक आणि आपल्या या मार्गाने जे वाडा मार्गाने ते आपल्याकडे येते आहे. दि. 16 रोजी सकाळी सुरुवात झाल्यानंतर भिवंडीच्या मुक्कामातच ते जनतेशी संवाद साधतील. ठाण्यातील जांभळी नाका येथे सकाळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची स्टेज नसणारी सभा होणार असल्याचे या वेळी थोरात यांनी सांगितले.

मुंबईत दि. 17 रोजी आघाडीची सार्वत्रिक मीटिंग घेण्यात येणार आहे. देशात सुरू असलेल्या अन्यायाचे वातावरण सुरू आहे, त्यासाठी ही विशेष यात्रा काढण्यात आली आहे. 2014 पासून मोदी सरकार देशात काम करत आहे, देशापुढे अनेक प्रश्न आहेत. त्यातून लोकशाहीवर आघात होत आहे. या सर्व गोष्टीवरती न्याय मागणारी ही न्याय यात्रा आहे, असे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सांगितलं आहे. भारत जोडो न्याय यात्रा ही मुलुंडला थांबणार दादर चैत्यभूमी या ठिकाणी समारोप असणार आहे.

भारतीय जनता पक्षाची राजकारण आणि सत्ता डोळ्यांसमोर ठेवून काम करत असल्याची कार्यपद्धती दिसत आहे. लोकसभा (Loksabha Election) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक सभा सुरू आहे. मात्र, मणिपूरमध्ये जाऊ शकले नाही, असे ते म्हणाले. ज्या ठिकाणी अडचणी आहेत. त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. रॅलीमध्ये आणि पब्लिक मीटिंगसाठी मित्र पक्षांना आम्ही आमंत्रण दिलं आहे, असे थोरात यांनी सांगितले. देश हा सर्वांचा आहे. राहुल गांधी ठाण्यात संवाद साधणार आहेत. तरुण पिढी मोठ्या संख्येने उपस्थित राहील, असेही थोरात यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात येत असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी दि. 16 रोजी ठाण्यातील जांभळी नाका येथे जनतेशी संवाद साधणार आहेत. भिवंडीतून याची सुरुवात होणार आहे. मणिपूरमध्ये जे घडलं ते वाईट आहे. देशात महागाई वाढलेली आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये दंगल सुरू आहे. हे जनतेला आणि सर्वांनाच दिसत आहे, महागाईच्या विरोधात न्याय यात्रा काम करत आहे. लोकशाही टिकावी यासाठी ही न्याय यात्रा असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT