Rahul Gandhi : भाजपच्या 'या' खासदारांची राहुल गांधी उडवणार झोप ? केंद्रीय मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दौरा

Bharat jodo Nyaay Yatra : राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' येत्या 10 मार्चला महाराष्ट्रात प्रवेश करीत आहे. या दौऱ्यात राहुल गांधी कांदा आणि द्राक्ष उत्पादकांच्या बांधावर जाऊन चर्चा करणार आहेत.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' येत्या 10 मार्चला महाराष्ट्रात प्रवेश करीत आहे. या दौऱ्यात राहुल गांधी चांदवड येथे थेट कांदा आणि द्राक्ष उत्पादकांच्या बांधावर जाऊन चर्चा करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी यांची दुसऱ्या टप्प्यातील 'भारत जोडो न्याय यात्रा' महाराष्ट्रात प्रवेश करीत आहे. (Marathi News)

नंदुरबार येथून ही यात्रा सुरू होईल. धुळे, साक्री मार्गे राहुल गांधी मालेगाव येथे येतील. मालेगाव येथे त्यांची मोठी सभा होणार आहे. त्यांच्या दौऱ्यातील हे सर्व लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. त्यामुळे हा दौरा भारतीय जनता पक्षाची झोप उडवणार का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rahul Gandhi
Lok Sabha Election 2024 : भाजपच्या पहिल्या यादीत नगरचा उमेदवार नसणार? काय आहे कारण?

भाजपच्या राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांच्या दिंडोरी मतदारसंघात राहुल गांधी यांचा दिवसभर कार्यक्रम असेल. राहुल गांधी चांदवड येथे 'रोड शो' करणार आहेत. यानंतर ते द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करतील. त्यासाठी वीस शेतकऱ्यांची यादी निश्चित करण्यात आली आहे. यादरम्यान राहुल गांधी कांदा आणि द्राक्ष उत्पादकांच्या बांधावरदेखील जाणार आहेत. यानिमित्ताने शेतकऱ्यांचा केंद्रातील सरकार विरोधातील संताप व्यक्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यमंत्री भारती पवार यांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे निरीक्षक ॲड. सुशांत मिश्रा आणि सरचिटणीस आशिष दुहा यांनी नुकताच मालेगाव आणि चांदवडचा दौरा केला. या वेळी त्यांनी 'भारत जोडो न्याय यात्रे'च्या मार्गातील कार्यक्रमांची निश्चिती करण्यासाठी माहिती घेतली. राहुल गांधी चांदवड येथून नाशिकला मुक्कामी येणार आहेत. या वेळी त्यांचा सिडको अथवा शहरात 'रोड शो' होणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी अत्यंत अडचणीत आहेत. केंद्र सरकारच्या धोरणामुळे जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष, कापूस व अन्य शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडलेली आहे. विशेषतः कांदा उत्पादक निर्यातबंदीमुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्याचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावरदेखील परिणाम होणार आहे.

या स्थितीत राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) दौऱ्याने शेतकऱ्यांच्या असंतोषाला वाट मिळणार आहे. त्यामुळे राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या चिंतेत भर पडली आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Rahul Gandhi
Dhule ACB Trap : लाच घेऊन घालवली पोलिसांची लाज; दुसऱ्यांदा लाच घेताना अटक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com