Loksabha Election : भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार, विद्यमान खासदार कपिल पाटील जोरदारपणे आपला प्रचार करत आहेत. मनसेची ताकददेखील त्यांना मिळाली आहे. पाटील विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी जास्तीत जास्त मताधिक्य मिळविण्यासाठी गल्लोगल्ली प्रचार करत आहेत. मनसेचे राजू पाटील यांचीदेखील त्यांनी भेट घेतली आहे. यावरून राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी कपिल पाटील यांना टोला लगावला आहे.
'2014, 2019 च्या निवडणुकीत पाटील (Kapil Patil) कोणता मोहल्ला, बिल्डिंगमध्ये गेलेले दिसले का? आज प्रत्येक बिल्डिंगमध्ये, प्रत्येक रस्त्यावर कपिल पाटील दिसतात. याचे श्रेय सर्व मतदारांचे आहे. ज्यांनी कपिल पाटील यांना दोन वेळा संधी दिली आणि तिसऱ्यावेळी रस्त्यावर आणले आहे,' असे म्हणत म्हात्रे (Suresh mhatre) यांनी थेट पाटलांवर निशाणा साधला आहे.
'विकासाच्या मुद्द्यावर मी ही निवडणूक लढविणार आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि या भागाचे खासदार कपिल पाटील यांनी मागील दहा वर्षांत विकासाची कोणतीही कामे केली नाहीत. मी विजयी झाल्यावर या भागातील विकासकामांवर फोकस करणार असून प्रत्येक वर्षात काय कामं केली व पुढे काय काम करणार याचा लेखाजोखा मांडणार', असा दावा सुरेश म्हात्रे यांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भिवंडी परिसरात एकही चांगला रस्ता नाही. सर्वोपचारी रुग्णालय नाही. लोकांना उपचारासाठी ठाणे, मुंबईत जावे लागते. निवडणुका जवळ आल्या की, कपिल पाटील फक्त कल्याण-मुरबाड-नगर रेल्वेचा विषय उकरून काढून त्य विषयी चर्चा घडवून आणतात. त्यांच्याकडून याविषयीचा पाठपुरावा होत नसल्याने हा रेल्वे मार्ग रखडला आहे, अशी टीका ही सुरेश म्हात्रे यांनी केली.
(Edited By Roshan More)
R.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.