sunetra pawar supriya sule sarkarnama
मुंबई

Loksabha Election 2024 : बारामतीचा 'सामना' ठरला; सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी; अजित पवार गटाची मोठी खेळी

Deepak Kulkarni

Loksabha News : लोकसभा निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, ठाकरे गटापाठोपाठ शनिवारी (ता.30) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली पहिली यादी जाहीर करतानाच पाच उमेदवारांची घोषणा केली. त्यात बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, वर्ध्यातून अमर काळे, दिंडोरीतून भास्करराव भगरे, अहमदनगर दक्षिणमधून नीलेश लंके यांच्या उमेदवारीचा समावेश होता.

ही यादी जाहीर झाल्यानंतर काही मिनिटांतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने मोठा डाव टाकतानाच बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे आता बारामतीत सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नणंद भावजयीची लढत पाहायला मिळणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानंतर अजित पवार गटानेदेखील आपल्या दोन उमेदवारांची शनिवारी घोषणा केली आहे. बारामतीतून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंविरोधात आता सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली आ, तर परभणीतून रासपचे महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बारामती लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ बनला आहे. कारण या मतदारसंघामध्ये पवार कुटुंबीयांमध्ये प्रतिष्ठेची लढाई रंगणार आहे. त्यामुळे ही निवडणूक कोण जिंकणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. याचवेळी भाजपने केलेलं फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलेलं नसून बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) या अडीच लाख मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास आमदार रोहित पवारांनी पुरंदरमध्ये व्यक्त केला आहे.

नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून, ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात सहभागी झाले आहेत. गेल्या काही काळापासून त्यांचे कार्यकर्ते त्यांना साहेबांसोबत राहण्याची विनंती करत होते. अशा अनेक नेत्यांना त्यांचे कार्यकर्ते साहेबांसोबत राहण्याची विनंती करत आहेत. नीलेश लंके हे साहेबांसोबत आल्याने आता त्यांची ताकद वाढली असून, लंके हे पुढचे खासदार असतील, असा विश्वास आपल्याला वाटत असल्याचंही रोहित पवार म्हणाले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT