PWD Minister Ravindra Chavan News Sarkarnama
मुंबई

Ravindra Chavan : भाजपला पुन्हा अटलजींची आठवण, जोडले डोंबिवली कनेक्शन

Roshan More

Dombivli : लोकसभा निवडणूक जवळ येत आहे तशी भाजपला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आठवण येत असल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील 'अटल सेतू'चे नुकतेच उद्घाटन केले. त्यानंतर आता भाजपकडून 'मैं अटल हूं' हा चित्रपट दाखवण्यासाठी संपूर्ण सिनेमागृह बुक केले असल्याचे समोर आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हा सिनेमा पाहिला.

सिनेमा पाहिल्यानंतर रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan ) यांनी चित्रपटातील डोंबवली कनेक्शन शोधून काढले. 'अटलजींच्या चरित्रावर चित्रपट प्रदर्शित झाला आणि ते सुद्धा दिग्दर्शक रवी जाधव यांच्या रूपात एका डोंबिवलीकर दिग्दर्शकाच्या हातून. 'मैं अटल हूं' ही अजरामर कलाकृती घडली आहे, याचा आनंद वाटत आहे.' असे चव्हाण यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे .

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknatha Shinde) शिवसेनेतून बाहेर पडण्याआधी त्यांनी 'धर्मवीर आनंद दिघे' हा चित्रपट काढला होता. त्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी झाल्या आणि सत्तापालट झाली. ज्यावेळी सत्ता पालट झाली त्यावेळी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावावर राजकारण केल्याचा आरोप देखील दबक्या आवाजात केला जात होता. त्याच पाऊलावर पाऊल टाकत भाजपकडून 'मैं अटल हूं' या सिनेमाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत केले जात असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांकडून प्रचार

भाजपचे आमदार आणि खासदार कार्यकर्त्यांना घेऊन हा सिनेमा पाहण्यासाठी जात आहेत. संपूर्ण थेटर बुक करून हा सिनेमा दाखवला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी तसेच अटलजींच्या जीवन समजून सांगण्यासाठी या चित्रपटाचा फायदा होत असल्याचे पदाधिकारीच बोलत आहेत.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT