Manoj Jarange Mumbai Route
Manoj Jarange Mumbai RouteSarkarnama

Manoj Jarange Mumbai Route : मुंबईपूर्वी शेवटचा मुक्काम लोणावळ्यातील 400 एकरात; 10 लाख चपात्या, पाण्याचे 50 टँकर...

Maratha Aarakshan Mumbai Morcha : तब्बल 400 एकरात आंदोलनकर्त्यांचा मुक्काम...
Published on

Pimpri Chinchwad News : मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी (ता.20) आंतरवली सराटी (जि.जालना) येथून मुंबईच्या दिशेने हजारो मराठ्यांसह कूच केले. ते 24 तारखेला पिंपरी-चिंचवडमध्ये येणार असून, त्यांच्या स्वागताची जोरात तयारी येथे सुरु झाली आहे. (Latest Marathi News)

Manoj Jarange Mumbai Route
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : सोलापुरातूनही मराठा बांधव मुंबईकडे रवाना; 'MIM'चा पाठिंबा,मुस्लिम ब्रिगेड मोर्चात...

दरम्यान 24 तारखेलाच जरांगेंचा ताफा उद्योगनगरीतून पुढे मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. मुंबई अगोदरचा शेवटचा मुक्काम त्यांचा लोणावळा येथे आहे. तेथे स्थानिक मराठा समाजाने चारशे एकराच्या दोन मैदानात त्यांची राहण्याची सोय केली आहे. महिला व पुरुषांची स्वतंत्र व्यवस्था दोन स्वतंत्र जागेत करण्यात आली आहे. तेथे स्वच्छता आणि सुरक्षिततेवर अधिक भर देण्यात आला आहे. (Maratha Aarakshan Mumbai Morcha)

मुक्कामात समाज बांधवासाठी लोणावळ्यातील प्रत्येक घरातून 25 चपात्या, शेंगदाण्याची चटणी देण्यात येणार आहे. अशा रितीने अंदाजे दहा लाख चपात्या, चटणी आणि पन्नास पाण्याचे टँकरची व्यवस्था मुक्कामी केली गेली आहे. तात्पुरती शौचालये तेथे उभारणीची तयारीही सुरु आहे. (Manoj Jarange Mumbai Yatra Route Schedule)

जरांगे 26 जानेवारीपासून मुंबईत बेमुदत उपोषण करणार आहेत. त्यासाठी ते आज आंतरवलीतून निघाले. येत्या बुधवारी (ता.24)औंध मार्गे सांगवी फाटा येथे त्यांचा ताफा उद्योगनगरीत दाखल होत आहे. जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, डांगे चौक, चाफेकर चौक, चिंचवड स्टेशन, आकुर्डी, निगडी, भक्ती शक्ती समूह शिल्प मार्गे आंदोलक लोणावळा येथे मुक्कामी आहेत.

Manoj Jarange Mumbai Route
Manoj Jarange Mumbai Morcha : वाट पाहत असलेल्या कुटुंबाला भेटून जरांगे भावूक, मुलगीही गळ्यात पडून रडली

ही पदयात्रा शहरातून सुरळीत पार पडण्यासाठी पोलिस, पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन, मराठा क्रांती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते समन्वयाने नियोजन करत आहे. शहरातील मराठा समाज अन्नदान, पाणी आणि फळवाटप करून या पदयात्रेचे वारीसारखे स्वागत करणार आहे. महापालिका फिरती स्वच्छतागृह, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा देणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com