Ujjwal Nikam News  Sarkarnama
मुंबई

Ujjwal Nikam News : कसाबला बिर्याणी दिली होती का? उज्ज्वल निकम म्हणाले, "काही वेळेला जुमले..."

Ajmal Kasab Biryani News : न्यायाधीश साहेब कसाबने बिर्याणीची मागणी कसाबने निकमांकडे केली म्हणे, त्याच्या वकील मी आहे, माझ्याकडे मागणी केली नाही.

Chetan Zadpe

Mumbai News : लोकसभेसाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने मुंबई उत्तर मध्यमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. यानंतर आता त्यांचा राजकारणात अधिकृत प्रवेश झाला आहे. मात्र प्रवेश होताच आता निकम यांनी केलेल्या मुंबई 26/11 चा दहशतवादी अजमल कसाबच्या बिर्याणीबाबत चर्चा सुरु सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत. याबाबत आता एका वृत्तवाहिनीशी संवाध साधताना निकम यांनी कसाबच्या बिर्याणीबाबत पुन्हा एकदा भाष्य केले आहे. (Latest Marathi News)

कसाबला सरकारकडून बिर्याणी खायला दिली होती का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर निकम म्हणाले, "सगळा किस्सा लोकांना माहिती आहे. पण असं तुम्हाला वाटतं का? की फक्त राजकारण्यांनीच 'ये राजकीय जुमला था' असं म्हणायचं. आम्ही देखील वकील आहोत. काही वेळेला जुमले करावे लागतात, तर काही वेळेला नॅरेशन सेट करावं लागतं. याला एक विशिष्ट उद्देश आहे. ज्यावेळी मी राखी बांधून न्यायालयात गेलो, तेव्हा कसाबने विचारलं की, बादशाह आपने ये क्या पहना है? मी म्हंटलं की हे राखी आहे. त्यावेळी तेथे न्यायाधीश आले. न्यायाधीश साहेब म्हणाले, काय बोलणी चालू आहे. तेव्हा कसाबचे डोळे छोटे झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तेव्हा पत्रकांरांनी मला विचारलं, "कसाबच्या डोळ्यात पाणी आलं त्याला बहिणीची आठवण आली. तुम्ही काय म्हणाल?" मी त्यावेळी फक्त बोललो की, "आज कसाबने मटण बिर्याणी की मांग की है. त्यानंतर लगेच ब्रेकींग न्यूज आली की, कसाबने मटण बिर्याणी की मांग की, असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं. यावर चर्चा सुरु झाल्या. मी फक्त बिर्याणीची मागणी केली एवढेच बोललो. त्यावेळच्या राजकीय विरोधी पक्षांना मुद्दा लावून धरला की, सरकार कसाबला बिर्याणी देत आहे." (Mumbai News)

"दुसऱ्या दिवशी न्यायालयात त्याच्या वकिलाने हा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, न्यायाधीश साहेब कसाबने बिर्याणीची मागणी कसाबने निकमांकडे केली म्हणे, त्याच्या वकील मी आहे, माझ्याकडे मागणी केली नाही. आता खरंच कसाबने बिर्याणी मागितली की नाही हे त्याला आणी मला माहिती आहे. पण आता ती व्यक्ती गेली आहे. आपल्या संस्काराप्रमाणे त्याच्याबद्दल बोलणे वाईट आहे," असे निकम म्हणाले. (Lok Sabha Election 2024)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT