Vinay Sahasrabuddhe|Eknath Shinde | Sanjiv Naik  Sarkarnama
मुंबई

Thane Lok Sabha Constituency : मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यावर भाजपचा दावा, कोण होणार 'ठाणेदार'?

सरकारनामा ब्यूरो

Thane Political News: अवघ्या तीन महिन्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे महायुतीत जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे. येवढा कमी कालावधी राहिला असूनही ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवार कोण असणार याचे चित्र स्पष्ट झालेले नाही. भाजपकडून या मतदारसंघावर दावा सांगितला जातो आहे.

त्यामुळे माजी खासदार संजीव नाईक आणि विनय सहस्त्रबुद्धे यांची नावे उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. दोघांनाही कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, आपला बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ सोडण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तयार नसल्याने हे दोघे उमेदवार गॅसवर आहेत. (Thane Lok Sabha Constituency )

शिवसेनेत फूट पडली तेव्हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत ठाण्यातील शिवसैनिक कायम राहिले. ठाण्यातील सर्व शाखा देखील एकनाथ शिंदे यांच्याच ताब्यात होत्या. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून हा मतदारसंघ ओळखला जात आहे.

सध्या ठाकरे गटात असलेले राजन विचारे हे येथून खासदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर शिंदे गटाकडून दावा करण्याची शक्यता आहे. मात्र, जागा वाटपात ही जागा कोणाची हे निश्चित झाली नसल्याने भाजपच्या उमेदवाराकंडून देखील येथे तयारी सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना-भाजप युतीच्या काळात ठाणे मतदारसंघ हा शिवसेनेकडे राहिला आहे. सध्या राजन विचारे हे आता येथून खासदार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटासोबत न जाता ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहिले आहेत. ठाकरे गटाकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, शिंदे गटाकडून अजून कोणाचे नाव समोर करण्यात आलेले नाही.

भाजपमधून आमदार संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांची नावे चर्चेत आहेत. तर, अजित पवार गटाकडून माजी खासदार आनंद परांजपे यांचे नाव चर्चेत आहेत. तर शिवसेना शिंदे गटातून आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, कोणाकडून आपणच उमेदवार असल्याचा दावा मात्र अजुनही करण्यात आला नाही.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT