Sambhaji Raje Chhatrapati : महाविकास आघाडीची ऑफर, पण 'स्वराज्य'चे काय; संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितलं

MVA And Swarajya Sanghtana : स्वराज्य संघटनेची व्याप्ती राज्यभर करण्याच्या दृष्टीने संभाजीराजेंचे प्रयत्न सुरू आहे.
Sambhaji Raje Chhatrapati
Sambhaji Raje ChhatrapatiSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : राज्यसभेचे माजी खासदार आणि स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरवण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी मात्र संभाजीराजेंना आघाडीतील तिन्हींपैकी एका घटक पक्षात प्रवेश करावा, अशी अट ठेवण्यात आल्याची माहिती आहे. त्यावर संभाजीराजेंनी आपली भूमिका जाहीरपणे स्पष्ट केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरसाठी आघाडी सक्षम आणि प्रभावी उमेदवाराच्या शोधात आहे. त्यातच काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांनी (Satej Patil) लोकसभेसाठी सरप्राईज चेहरा असल्याचे सांगत निवडणुकीत ट्विस्ट आणला. त्यास आता संभाजीराजेंच्या विधानाने अधिक बळ मिळाले आहे. संभाजीराजेंनी कोल्हापूरमधून लोकसभा लढण्याचे संकेत दिल्यानंतर आघाडीकडून त्यांचे नावास प्राधान्य असल्याचे बोलले जाते. त्यासाठी मात्र संभाजीराजेंना आघाडीतील एका पक्षात प्रवेश करावा लागणार आहे. यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Sambhaji Raje Chhatrapati
Rohit Pawar ED Enquiry : रोहित पवारांची तब्बल आठ तास चौकशी; 'या' दिवशी पुन्हा ईडीने बोलावले

संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) म्हणाले, महाविकास आघाडीतील पक्षात प्रवेश करण्याऐवजी स्वराज्य पक्षच आघाडीसोबत जाईल. स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्या पक्षाबाबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल. या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरू राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता त्यास महाविकास आघाडी तायर होणार का, याकडे लक्ष आहे.

Sambhaji Raje Chhatrapati
Loksabha Election 2024 : विरोधकांनी घेरलेल्या नारायण राणेंच्या मदतीला धावले केसरकर; केला 'हा' मोठा दावा

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेचा विचार केल्यास, स्वराज्य संघटनेची व्याप्ती राज्यभर करण्याच्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच राज्याच्या राजकारणात या तिन्ही पक्षाबरोबर स्वराज्याचे महत्त्व वाढवण्याचा दृष्टिकोन संभाजीराजेंचा आहे. हायकमांडच्या गोष्टी मान्य केल्यास त्यांना त्यांच्या चालीरीतीप्रमाणे वागावे लागणार आहे. पण स्वतंत्र आणि पुरस्कृत राहिल्यास स्वराज्य संघटनेचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोकळीक मिळणार आहे. तसेच स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहून राज्यातील आपले राजकीय वजन आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न संभाजीराजे करणार आहेत.

स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढवल्यास त्यांना राजे म्हणून मतदान करणारा मोठा वर्ग आहे. तो कायम संभाजीराजेंच्या मागे राहू शकतो. मात्र महाविकास आघाडीच्या घटकपक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या वर्ग महायुतीकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे. तो वर्ग कायमचा स्वराज्य पक्षापासून दुरावण्याची शक्यता आहे. हेच सूत्र राज्यात लागू होणार आहे. याचा फटका स्वराज्य संघटनेला भविष्यात बसू शकतो. हे जाणून असलेले संभाजीराजे कुठल्याही पक्षात प्रवेश करण्याऐवजी आपला स्वराज्य संघटना पक्ष आघाडीसोबत नेण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते.

(Edited by Sunil Dhumal)

Sambhaji Raje Chhatrapati
Congress Leader Statement: काँग्रेसच्या खासदाराचे वादग्रस्त विधान; म्हणाले,'दक्षिण भारताला स्वतंत्र देश जाहीर करा'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com