Jitendra Awhad-Ajit Pawar
Jitendra Awhad-Ajit Pawar  Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Vs Jitendra Awhad : भाजप का लाडला भाई 'लाडली बहना' योजना लेके आया है : जितेंद्र आव्हाडांचा अजितदादांवर हल्लाबोल

Vijaykumar Dudhale

Mumbai, 28 June : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प जाहीर केला. त्यात अजित पवारांनी महिलांसाठी लाडकी बहिण योजना आणली आहे. मात्र, योजनेवरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना लक्ष्य करताना ‘भाजप का लाडका भाई लाडली बहना योजना लेके आया है. पिछली तीन-चार महिनों से अपनी बहेना को तकलीफ देनेवाले के लिए कोई लाडली नही है,’ अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्प मांडताना अनेक घोषणांचा पाऊस पाडला आहे. त्यात महिलांसाठीच्या योजना प्रभावशाली सध्या तरी वाटत आहेत. अर्थसंकल्पातून (Budget) अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सादर केली आहे. त्या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 60 वयोगटातील महिलांना प्रतिमहिना दीड हजार रुपये मिळणार आहेत. ही योजना निवडणुकीत इम्पॅक्ट करणारी ठरू शकतो.

याच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवरून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार यांच्या टीका केली आहे. ते म्हणाले, भाजपच्या लाडक्या भावाने (आता ते किती जणांचे लाडके आहेत, ते कळत नाही) लाडकी बहिण ही योजना आणली आहे. पण, मागील चार महिने स्वतःच्या लाडक्या बहिणीला किती छळले, हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले आहे.

त्यांच्यासाठी कोणीही लाडकी नाही. त्यांच्यासाठी फक्त राजकारण महत्वाचं आहे. आता त्यांना पुढील निवडणुकीतील पराभव दिसत आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी त्यांनी हे पत्ते फेकले आहेत. हा अर्थसंकल्प फसवा आहे. कारण तसं नसतं तर त्यांनी अर्थसंकल्पात मूल्यमापन आणि सुसुत्रीकरण करण्यासाठी आम्ही एक उच्चस्तरीय समिती नेमणार आहोत, असं म्हटलंच नसतं, असा दावाही आव्हाड यांनी केला.

ते म्हणाले, उच्चस्तरीय समिती नेमणे म्हणजे मूल्यमापन न करता, सुसुत्रीकरण न करताच अजित पवार यांच्याकडून हा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. आता जे काही करायचे आहे, ती समिती करेल, असे उत्तर द्यायला हे आता मोकळे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT