Maharashtra Additional Budget : ‘जयंत पाटीलसाहेब, सिंचनाच्या 108 प्रकल्पांना सुप्रमा दिली, आपल्यावेळी ते पुढंही जायचं नाही’ : अजितदादांचा चिमटा

Ajit Pawar Vs Jayant Patil : अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडताना अपूर्ण सिंचन प्रकल्पाला सुप्रमा (सुधारित प्रशासकीय मान्यता) देण्याच्या मुद्यावरून जयंत पाटील यांना टोला लगावला.
 Ajit Pawar- Jayant Patil
Ajit Pawar- Jayant Patil Sarkarnama

Mumbai, june 28 June : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला. तो मांडताना अपूर्ण सिंचन प्रकल्पाला सुप्रमा (सुधारित प्रशासकीय मान्यता) देण्याच्या मुद्यावरून अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टोला लगावला. ‘आमच्या सरकारने आतापर्यंत १०८ प्रकल्पांना सुप्रमा देण्यात आली आहे, जयंत पाटील साहेब, आपल्यावेळी ते पुढंही जायचं नाही’ असे अजितदादांनी जयंतरावांना विधानसभेत सुनावले.

विधानसभेत अतिरिक्त अर्थसंकल्प ( Additional Budget) मांडताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, विविध कारणांमुळे अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत आमच्या सरकारने १०८ प्रकल्पांना सुप्रमा दिलेला आहे, जयंत पाटीलसाहेब (Jayant Patil). आपल्यावेळेस ते पुढंही जायचं नाही.

येत्या दोन वर्षांत राज्यातील ६१ सिंचन प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यातून तीन लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्राला पाणी पुरविता येणार आहे. सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि प्रकल्पातील वितरण प्रणालीतील सुधारणांसाठी ‘नाबार्ड’कडून १५ हजार कोटींचे दीर्घ मुदतीचे अर्थसाहाय्य मंजूर झाले आहे, ते आपण केव्हाही उचलू शकतो आणि रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावू शकतो, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

 Ajit Pawar- Jayant Patil
Baba Gujar : अजितदादांना अडचणीत आणणाऱ्या बाबा गुजरांना राष्ट्रवादी नेत्याची तंबी!

अजित पवारांनी अर्थसंकल्पात मांडले आहे की, वन्यजीवांच्या हल्ल्यात नागरिक मृत्युमुखी पडल्यास पहिले २० लाख रुपयांची मदत दिली जायची. ती मदत आता २० लाखांवरून २५ लाख करण्यात आली आहे. कायमचे अपंगत्व आल्यास पाच लाखांवरून साडेसात लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. वन्यजीवांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यास सव्वा लाखाऐवजी आता पाच लाखांपर्यंत मदत मिळणार आहे, तर किरकोळ जखमी झाल्यास वीस हजारांच्या ऐवजी आता पन्नास हजारांची मदत मिळणार आहे.

वन्यजीवांनी शेती पिकांचे नुकसान केल्यास पहिल्यांदा २५ हजार रुपयांची शासकीय मदत मिळत होती. पण ती आता पन्नास हजार रुपये देण्यात येईल. पशुधनहनीच्या भरपाईत भरघोस वाढ करण्यात आलेली आहे, असेही अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

 Ajit Pawar- Jayant Patil
Mahavikas Aghadi News : शिवसेना अन् राष्ट्रवादीकडून होणार काँग्रेसची कोंडी?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com