Ambernath Politics : अंबरनाथमध्ये भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होणार, असे वाटत असतानाच काँग्रेसच्या 12 नगरसेवकांना पक्षानं निलंबित केलं. त्यामुळे मिशन लोटस राबवत या नगरसेवकांना आपल्या पक्षात घेण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्याची चर्चा आहे.
तांत्रिक दृष्ट्या हे नगरसेवक सध्या अपक्ष असून त्यांचा गटही स्थापन झालेला नाही. त्यामुळे त्यांच्यातले 2 - 4 नगरसेवक फुटून त्यांनी वेगळा गट स्थापन केला किंवा ते एखाद्या पक्षात गेले, तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही. याचाच फायदा घेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून सत्तास्थापनेसाठी आवश्यक 2 नगरसेवक आपल्या बाजूने वळवण्याचा जोरदार प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यामुळे 'मिशन लोटस'ला शिंदेंची शिवसेना चकवा देणार असे बोलले जात आहे.
अंबरनाथ पालिकेत भाजपाच्या नगराध्यक्षा थेट जनतेतून निवडून आल्या असल्या तरी उपनगराध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती बसवण्यासाठी बहुमत आवश्यक आहे. सध्या कोणत्याच पक्षाकडे बहुमताचा 30 नगरसेवकांचा आकडा नसल्यानं भाजपाचे 15, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादीचे 4 अशा 31 नगरसेवकांनी एकत्र येत अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली आणि अभिजीत करंजुले यांना गटनेता म्हणून नियुक्त केले. पण बुधवारी काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचं पक्षातून निलंबन झाल्यानं त्यांनी काँग्रेसच्या लेटरहेडवर भाजपाला दिलेला पाठींबा आणि स्थापन केलेला अंबरनाथ विकास आघाडी हा गट देखील अवैध झाला आहे.
सोबतच गटनेत्यांचा व्हीपही त्यांना लागू असणार नाही. काँग्रेसचे 12 नगरसेवक हे तांत्रिक दृष्ट्या अपक्ष झाल्याने आता गट स्थापनेची प्रक्रिया नव्यानं करावी लागणार आहे. त्यातही 2 तारखेनंतर एकत्रित गट स्थापन करायला परवानगी नसल्यानं आता प्रत्येक पक्षाला नव्यानं आपला गट स्थापन करावा लागणार आहे.
हीच संधी साधत 27 नगरसेवक आणि १ अपक्ष मिळून 28 संख्याबळ असलेल्या शिवसेनेनं पुन्हा एकदा 30 चा आकडा गाठून बहुमत सिद्ध करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तांत्रिक दृष्ट्या अपक्ष आणि सध्या कोणत्याही गटात नसलेल्या काँग्रेसच्या 2 ते 3 नगरसेवकांना आपल्या गटात घेण्यासाठी शिवसेना कामाला लागली असून त्यामुळे येत्या काळात शिवसेना ही भाजपाला शह देऊन एकहाती सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करताना दिसेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.