BJP MLA Ganpat Gaikwad Sarkarnama
मुंबई

Ganpat Gaikwad : गायकवाडांच्या पोलिस कोठडीची मागणी न्यायालयानं फेटाळली, सुनावणीत नेमकं काय घडलं?

Ganpat Gaikwad News : आमदार गायकवाडांना उल्हासनगरमधील चोपडा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

Bhagyashree Pradhan

काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड ( Ganpat Gaikwad ) यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. याप्रकरणी गणपत गायकवाडांची पोलिस कोठडी संपल्यानं त्यांना आज ( 14 फेब्रुवारी ) उल्हासनगरमधील चोपडा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तेव्हा न्यायाधीश ए.ए. निकम यांनी गणपत गायकवाडांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे गायकवाड जामीन घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गणपत गायकवाडांची पोलीस कोठडी संपल्यानं सकाळी नऊ वाजताच उल्हासनगर येथील चोपडा न्यायालयात हजर केलं होतं. यावेळी न्यायाधीश ए.ए निकल यांच्यासमोर आमदार गायकवाडांच्या जामीनावर सुनावणी पार पडली. यावेळी पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती. पण, न्यायाधीश यांनी पोलीस कोठडीची मागणी अमान्य करत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

न्यायालयात काय घडलं?

आमदार गायकवाडांच्या वतीनं पाच वकिलांनी युक्तिवाद केला. "आमदार गायकवाड यांच्याबाबत पोलिसांनी केलेला तपास आणि पोलिस कोठडी पुरेशी असून नवीन कोणतीही माहिती मिळवली नाही. सर्वकाही वरिष्ठ पोलिस निरक्षकांच्या डोळ्यासमोर घडलं. त्यामुळे याप्रकरणात कोणतीही विसंगती पाहायला मिळत नाही," असा युक्तिवाद वकिलांकडून करण्यात आला.

यानंतर न्यायाधीश निकल म्हणाले, "आमदार गायकवाडांना बारा दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांना पुरेसा वेळ देण्यात आला होता. पोलिसांच्या हाती नवीन कुठलीही माहिती नाही. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येत आहे."

न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आमदार गायकवाड जामीन घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबद्दल आमदार गायकवाडांच्या वकिलांना विचारलं असता त्यांनी कोणतीही स्पष्टता देण्यास नकार दिला.

आमदारांना ठेवणार आधारवाडी जेलमध्ये?

यावेळी वकिलांनी आमदार गणपत गायकवाडांना कल्याण येथील आधारवाडी जेल येथे ठेवण्यात येऊ शकते, अशी माहिती दिली. मात्र, हा तपास ठाणे गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्यानं गायकवाडांना नेमकं कोणत्या जेलमध्ये ठेवणार? याची कोणतीही स्पष्टता न्यायाधीशींनी दिली नसल्याची माहिती वकिलांनी दिली.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT