Ganpat Gaikwad Case : गणपत गायकवाडांचं भाजपमध्ये होणार प्रमोशन?

Ganpat Gaikwad Firing Case : भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा राजीनामा का घेतला नाही?
BJP MLA Ganpat Gaikwad
BJP MLA Ganpat GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Nana Patole Mumbai News :

उल्हासनगरमधील पोलिस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणी त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. असं असतानाही त्यांच्या भाजपने अद्याप त्यांचा राजीनामा मागिलेला नाही. यावर काँग्रेस नेत्याने निशाणा साधला आहे.

अद्याप राजीनामा का घेतला नाही?

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस निरीक्षकाच्या दालनात गोळीबार केला. तरीही त्यांच्या भाजपकडून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली नाही. गणपत गायकवाड यांच्या विषयी बोलणं पक्षातील नेते टाळत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजप आमदाराने ( Ganpat Gaikwad ) गोळीबार केला, ही घटना सीसीटीव्हीमध्ये टिपली गेली. पण पक्षाने किंवा राज्य सरकारने त्यांचा राजीनामा मागितलेला नाही.

BJP MLA Ganpat Gaikwad
Abhishek Ghosalkar Case : मॉरिस चार दिवसांपूर्वीच 'वर्षा' बंगल्यावर होता, मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटोही समोर!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर परखड प्रतिक्रिया दिली आहे. गणपत गायकवाड यांच्या विरोधात पक्षाने अजूनही कारवाई केलेली नाही, ही खेदाची बाब आहे. मात्र, त्यांनी गोळीबार केल्यामुळे त्यांचा राजीनामा नाही तर, पक्षात त्यांना प्रमोशन मिळणार आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला. राज्यात गुंडा राज सुरू आहे आणि सत्ताधारीच कायद्या मोडीत काढत आहेत. राज्यात आता कोणाचा धाक उरला नाही, असा आरोप पटोले यांनी केला.

पोलिस ठाण्यात अन्नत्याग

गोळीबार केल्याने आमदार गणपत गायकवाड यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. पण तिथे त्यांनी अन्नत्याग केल्याची माहिती समोर येत आहे. ते केवळ फळांचं सेवन करत आहेत. पोलिसांवर आपला विश्वास नाही आणि अन्नातून कदाचित आपल्याला विष दिले जाऊ शकते, असा संशय गणपत गायकवाड यांना आहे. म्हणून त्यांनी अन्नत्याग केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार गणपत गायकवाड यांनी गुन्ह्याची कबुली दिली असतानाही त्यांच्या मुलावर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांवर राजकीय दबाव आहे. यामुळे कारवाई केली जात आहे, असाही आरोप आमदार गायकवाड यांनी केला आहे.

कल्याण जवळच्या द्वारली गावातील जमिनीच्या वादातून हिललाइन पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्ये गणपत गायकवाड यांनी कल्याण शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. यात महेश गायकवाड जखमी झाले. या प्रकरणी आमदार गायकवाड सध्या पोलिस कोठडीत आहेत. पोलिसांकडून दिले जाणारे जेवण गायकवाड यांनी नाकारले आहे.

edited by sachin fulpagare

BJP MLA Ganpat Gaikwad
Abhishek Ghosalkar Shot Dead Update : यूपीच्या बंदुकीने केला अभिषेक घोसाळकर यांचा घात?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com