Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

BJP Leader join Shiv Sena : ठाकरेंचा भाजपला जोरदार धक्का; महिला आघाडीचा आक्रमक चेहरा शिवसेनेत दाखल

Thane News : भाजपच्या ज्योती पाटील आणि पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्रीवर येऊन शिवसेनेत प्रवेश केला

Vijaykumar Dudhale

Mumabi News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज (ता. २५ नोव्हेंबर) मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या दिवा शहर माहिला आघाडीच्या प्रमुख ज्योती पाटील यांचा समावेश आहे. (BJP's Jyoti Patil and office bearers join thackeray's Shiv Sena)

ज्योती पाटील या तन्वी फाउंडेशनच्या माध्यमातून दिवा शहरात महिलांसाठी काम करीत आहेत. दिव्यातील दिग्गज चेहरा म्हणून ज्योती पाटील यांची ओळख आहे. पाटील यांनी महिलांच्या प्रश्नावर कायम आवाज उठविला आहे. आक्रमक चेहरा ठाकरे गटाला मिळाल्याने ठाणे शहरात उत्साहाचे वातावरण आहे. तसेच भाजपचे ठाण्यातील पदाधिकारी यांनीही ठाकरे गटात प्रवेश केला आहे. अंतर्गत राजकारणाला कंटाळून ज्योती पाटील यांनी भाजपला रामराम ठोकल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, पालघर भागाकडे माझ्याकडून दुर्लक्ष झाले आहे, हे मोठ्या मनाने मान्य करतो. संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना पालघरकडे माझे येणे थोडं कमी झालं आहे. लोकसभेची पोटनिवडणूक आपण लढलो होतो. त्यानंतरची लोकसभा निवडणूक आपण जिंकलो. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही आपल्याला भगवा फडकवत ठेवायचा आहे. मी लवकरच पालघरचा दौरा करणार आहे.

जनतेला काय पाहिजे, हे राज्यकर्त्यांना कळत नसेल तर जनतेचा आवाज त्यांच्या कानापर्यंत कसा पोचवायचं, हे शिवसेनेला चांगलं कळतं. आता सध्या देशात जे गोंधळाचं वातावरण आहे. त्यावर मी जाहीर सभेत बोलणार आहे. मी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही तर प्रवृत्तीच्या विरोधात आहे, असेही ठाकरेंनी स्पष्ट केले.

आपल्याला जी हुकूमशाही दिसत आहे, ती आताच तोडून मोडून काढली नाही तर यापुढे ती आपल्याला डोक वर काढू देणार नाही. सर्वसामान्य माणसाला कोणाचेही तरी गुलाम बनून राहावं लागेल. गुलाम बनून राहणं हे मला चालणार नाही. मी तुम्हालाही कोणाला गुलाम होऊ देणार नाही. पालघरमध्ये जाहीर सभेसाठी वेळ आणि ठिकाण ठरावा, ते माझ्या मनातील बोलल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT