Shivsena Political News : शेतकऱ्यांनी दुष्काळाशी दोन हात करत कसेबसे उसाचे पीक घेतले आहे. मात्र, कारखान्यांनी अधिकृतपणे कोणताही दर जाहीर न करता आडमुठेपणाची भूमिका घेत ऊसतोड सुरू केली आहे. यातून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत असून, याच्या निषेधार्थ खटाव तालुक्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
खटाव तालुक्यातील वर्धनगड येथे आज सकाळी शिवसेना ठाकरे गटाचे Shivsena नेते प्रताप जाधव, जिल्हा नियोजन समितीचे अर्जुन मोहिते, माजी संपर्कप्रमुख महिपती डंगारे, विभाग प्रमुख मुगुटराव कदम, रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी कारखान्यांना Sugar Factory ऊस वाहून नेणारे ट्रॅक्टर रोखले.
ऊसदर न देणाऱ्या कारखानदारांविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे बराच वेळ वाहने जागेवरच थांबून राहिली. ऊसदराबाबत पुसेगाव पोलिसांना निवेदन दिल्यानंतर वाहने सोडण्यात आली. या वेळी प्रताप जाधव म्हणाले, शेतकरीहितासाठी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दर जाहीर होईपर्यंत कारखान्यांना ऊस देऊ नये. Maharashtra Political News
कारखान्यांनी पहिली उचल विनाकपात ४००० रुपये देण्याची आमची मागणी आहे. दोन दिवसांच्या आत कारखान्यांनी दर जाहीर केले नाहीत, तर शिवसेना ठाकरे गट आणखी तीव्र आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.