NCP Crisis : ‘दादा...दादा..करता अन्‌ पिटिशन दाखल करता’ तटकरेंच्या प्रश्नाला सुळेंचे उत्तर ‘मी मर्यादा ओलांडणार नाही...’

NCP Disqualification Case : राज्यसभा आणि लोकसभेत ज्या दोन लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या निर्णयाला पाठिंबा दिला, म्हणून आम्ही त्या दोन लोकांना अपात्र करण्याची मागणी केली आहे.
Sunil Tatkare-Supriya Sule
Sunil Tatkare-Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : अपात्रतेच्या कारवाईच्या मागणीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट आमने सामने आले आहेत. ‘दादा...दादा... म्हणत ज्यांचं राजकीय आयुष्य आतापर्यंत व्यतित झालं आहे, तेच लोक अजित पवारांविरोधात अपात्रेसंदर्भात पिटिशन दाखल करतात, असा टोला खासदार सुनील तटकरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला. त्याला सुळेंनी मी मर्यादा ओलांडणार नाही; कारण माझ्यावर संस्कार झाले आहेत,’ अशा कानपिचक्या देत उत्तर दिले आहे. त्यामुळे अपात्रतेच्या मुद्द्यावर दोन्ही गटांत चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. (NCP Crisis : Political allegations between MP Supriya Sule and Sunil Tatkare)

अजित पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि शरद पवार वगळता खासदार श्रीनिवास पाटील, महंमद फजल, फौजिया खान आणि वंदना चव्हाण यांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे शरद पवार गटाकडून अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी एकाच पक्षात एकत्र नांदणारे हे सहकारी आता मात्र रोज एकमेकांवर तोंडसुख घेत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sunil Tatkare-Supriya Sule
Jayant Patil Vs CM : ‘यापूर्वी कधीही असं घडलं नाही, आता नवीन पद्धत सुरू होतेय’; जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या अपात्रतेच्या कारवाईच्या मागणीवर प्रश्नचिन्ह उभारले आहे. त्या म्हणाल्या की, तुम्ही वैचारिक भूमिकेशी तडजोड करणार असाल तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांवर अपात्रतेची कारवाई करावी, यासाठी आम्ही मागणी केली आहे. अपात्रतेच्या कारवाईची आमची मागणी सिलेक्टिव्ह केलेली नाही.

राज्यसभा आणि लोकसभेत ज्या दोन लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या निर्णयाला पाठिंबा दिला, म्हणून आम्ही त्या दोन लोकांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. ही कारवाई आम्ही सिलेक्टिव्ह केलेली नाही. आता त्यांनी का सिलेक्टिव्ह मागणी केली नाही. आता त्यांनी का सिलेक्टिव्ह लोकांनाच अपात्र करण्याची मागणी केली आहे, याचे उत्तर माझ्याकडे नाही, असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Sunil Tatkare-Supriya Sule
Kolhapur Politic's : सतेज पाटलांना लक्ष्य करत राजेश क्षीरसागरांनी ‘दक्षिणोत्तर’ विजयाचे रणशिंग फुंकले

सुळे यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेली ३० वर्षांत बारामती उभी केली. दादा... दादा....असं म्हणत त्यांचं राजकीय आयुष्य आतापर्यंत व्यतित झालं. पण, अजितदादांच्या विरोधात अपात्रतेसंदर्भात पिटिशन दाखल करताना सांगणार, की राजकीय भूमिका वेगळी असल्यामुळे आम्ही कारवाईची मागणी करतो आहोत. स्वतःचं अपयश झाकण्यासाठी नैराश्येपोटी जेव्हा दुसऱ्यांवर आरोप केले जातात. त्यावेळी अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

Sunil Tatkare-Supriya Sule
Sangola Politics : दीपक साळुंखेंनी वाढविले शहाजीबापू पाटलांचे टेन्शन...

तटकरे यांच्या टीकेला उत्तर न देता सुप्रिया सुळे यांनी कानपिचक्या दिल्या आहेत. माझ्यावर वेणूताई आणि यशवंतराव चव्हाण, तसेच प्रतिभा आणि शरद पवार यांचे संस्कार आहेत. त्यामुळे ती मर्यादा मी कधीच ओलांडू शकत नाही आणि ओलांडणारही नाही. कारण माझ्यावर सुसंस्कृत मराठी संस्कार झाले आहेत. जे संस्कार माझ्यावर माझ्या आई-वडिलांनी केले आहेत, असे सुळे यांनी म्हटले आहे.

Sunil Tatkare-Supriya Sule
NCP Crisis News : 'अजित पवारांचा पक्ष विस्तारामध्ये कुठलाही हातभार नाही'; शरद पवार गटाच्या वकिलांचा मोठा दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com