Ramesh Mhatre Custody sarkarnama
मुंबई

Ramesh Mhatre : डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट का? हायकोर्टाने ठाणे पोलिसांची पिसे काढली; सुनावणीत कडक ताशेरे!

Dombivli Doctor Assault Case News : रमेश म्हात्रेसह इतर सर्व आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी कोर्टाने सुनावली होती. मात्र, म्हात्रे प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे पोलिसांची खरडपट्टी केली आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : डोंबिवलीच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टराना मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर आरोपींना अटक केली होती. रमेश म्हात्रेसह इतर सर्व आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी कोर्टाने सुनावली होती. मात्र, म्हात्रे प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे पोलिसांची खरडपट्टी केली आहे. आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आल्याची टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने करीत खडे बोल सुनावले आहेत. नागरिकांचे संरक्षण करणे अपेक्षित असल्याचे सांगत हायकोर्टाने ठाणे पोलिसांची पिसे काढली आहेत.

आरोपी रमेश म्हात्रेला आणखी थोडे दिवस आत राहुदेत, म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेंची कानउघाडणी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेंची देखील कानउघाडणी केली. 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत असलेल्या रमेश म्हात्रेला आणखी, थोडे दिवस आत राहुदे, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. म्हात्रेच्या वयाचा उल्लेख करत अटी शर्थींसह जामीन मागणाऱ्या वकिलांना देखील उच्च न्यायालयाने सवाल केला.

डोंबिवलीच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरला एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी रमेश म्हात्रेसह इतर सर्व आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, अशातच रमेश म्हात्रे प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांचीही खरडपट्टी केली.

जेलमध्ये आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आल्याची टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. नागरिकांचं संरक्षण करणं पोलिसांकडून अपेक्षित असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. पोलीस आरोपींचं संरक्षण करतात अशी परिस्थिती आम्हाला नको आहे. रमेश म्हात्रेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रिमांडसाठी हजर करणाऱ्या ठाणे पोलिसांच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

रिमांड मागण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपीला कोर्टात हजर करण्याची मागणी अतिशय इनोव्हेटिव्ह आहे. मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी केली आहे. अधिकारी स्वतःचीच कार्यपद्धती सुरू करू पाहत आहेत का? असा सवाल देखील न्यायालयाने केला आहे. कोण होते ते अधिकारी अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाकडून करण्यात आली. याप्रकरणी आम्ही सोमवारच्या सुनावणीत ठाणे पोलीस आयुक्तांनी बोलावू शकतो असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

त्याचवेळी कोर्टाने म्हात्रे यांच्या वयावरून व्हिडिओत तुमचे वय 25 असल्यासारखा भास होतोय. महिलांना आणि डॉक्टरांना तुम्ही मारहाण केली आहे. तुम्ही समाजकार्यात आहात, तुमचं कर्तव्य लोकांची सेवा करणं आहे की त्यांना मारण, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेला केला आहे. एखाद्या वकिलाने वकीलपत्र घेणं टाळलं तर त्याला देखील मारणार का? असा सवाल न्यायालयाने केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाचे रमेश म्हात्रेला खडेबोल सुनावले. या प्रकरणी सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT