Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांनंतर आधी मुख्यमंत्रीपद, मग उपमुख्यमंत्रीपद, नंतर मंत्रीपदांचे वाटप आणि शेवटी खातेवाटप या बाबी टप्प्याटप्प्याने चर्चेत राहिल्या. यासाठी महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांत चुरस दिसून आली. तीन सत्ताधारी पक्षांमधल्या ज्या नेत्यांना खाते मिळाले नाही, त्यांची नाराजी जाहीरपणे समोर येत आहे. त्यातच आता गेल्या दोन दिवसापासून पालकमंत्रीपदांवरून महायुतीमधील तीन पक्ष दावे करीत असतानाच आता खाते वाटप झाल्यानंतर मंत्र्यांना दालन देण्यात आले तर बंगल्यांचेही वाटप करण्यात आले आहे. (Ministry Bungalow news)
राज्य सरकारचे खाते वाटप दोन दिवसांपूर्वी जाहीर झाल्यानंतर मंत्र्यांना दालन देण्यात आले होते. या दालनापाठोपाठ आता मंत्र्यांना बंगल्यांचेही वाटप करण्यात आले आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे. तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पर्णकुटी बंगला देण्यात आला आहे.जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयलस्टोन तर शंभूराज देसाईंना (Shambhuraj Desai) मेघदूत बंगला देण्यात आला आहे.
दुसरीकडे वनमंत्री गणेश नाईकांना पावनगड बंगला मिळाला आहे. तर हसन मुश्रीफ यांना विशाळगड, चंद्रकांत पाटील यांना ब एक सिंहगड, गिरीश महाजन यांना सेवा सदन, गुलाबराव पाटील यांना जेतवन हा बंगला देण्यात आला आहे.
अदिती तटकरे यांना प्रतापगड, शिवेंद्र राजे भोसले यांना पन्हाळगड, माणिकराव कोकाटे यांना अंबर, जयकुमार गोरे यांना प्रचितीगड, नरहरी झिरवाळ यांना सुरुची,जयकुमार रावल यांना चित्रकूट तर अतुल सावे यांना शिवगड हा बंगला देण्यात आला आहे. आशिष शेलार यांना रत्नसिंधू, दत्तात्रय भरणे यांना सिद्धगड, तर संजय सावकार यांना अंबर 32 तर संजय शिरसाट यांना अंबर 38 हा बंगला देण्यात आला आहे.
संजय राठोड यांना शिवनेरी बंगला, दादा भुसे यांना ब तीन जंजिरा हा बंगला देण्यात आला आहे.उदय सामंतांना मुक्तागिरी तर धनंजय मुंडे यांना सातपुडा हा बंगला देण्यात आला आहे. दालनापाठोपाठ आता मंत्र्यांना बंगल्यांचे देखील वाटप करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.