Chhagan Bhujbal News Sarkarnama
मुंबई

Chhagan Bhujbal News : ...तर मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो; भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट!

Lok Sabha Election 2024 : तेव्हा आम्ही काँग्रेसमध्ये होतो. पक्ष फुटला नसता तर मला खात्री आहे. मी शंभर टक्के मुख्यमंत्री झालो असतो."

Chetan Zadpe

Mumbai Political News : लोकसभा निवडणुकांची एकीकडे रणधुमाळी सुरु आहे. राज्यातील पाचव्या आणि अखेरच्या टप्यासाठी उद्या (दि.20) मतदान पार पडणार आहे. दरम्यान याआधीच राजकीय नेत्यांच्या दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आपण जर आपण शरद पवार यांच्यासोबत गेलो नसतो तर काँग्रेसकडून आपल्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती, मी 1999 च्या दरम्यान मुख्यमंत्री झालो असतो, असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Latest Marathi News)

माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, "ज्यावेळेला 1995 मध्ये आमचं सरकार गेलं, त्यावेळेस शरद पवारांनीच मला एमएलसी केलं होतं आणि विरोधीपक्ष नेता केलं. त्या कालावधीत मी शिवसेना-भाजप सरकारविरोधात विरोधीपक्ष नेता म्हणून काम केलं, तेव्हा माझ्या घरावर हल्ला झाला होता. त्यावेळेला मी 'वन मॅन आर्मी' म्हणून लढलो होतो. आम्ही काँग्रेसमध्ये होतो. पक्ष फुटला नसता तर मला खात्री आहे. मी शंभर टक्के मुख्यमंत्री झालो असतो."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"शरद पवारांना (Sharad Pawar) ज्या वेळेला काँग्रेसमधून बाहेर काढलं गेलं. काँग्रेस पक्ष त्यावेळेला फुटला. त्यावेळेला सुद्धा मी पवारांसोबत न जाता काँग्रेसमध्ये थांबावं, काँग्रेस तुम्हाला पुढच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला घोषित करेल, असे मला अनेक फोन-मॅसेज आले," असा दावा भुजबळ यांनी केला आहे.

माधवराव शिंदे, शीला दीक्षित, फर्नांडिस, राजेश पायलट, मुकुल वासनिक, सुरेश कलमाडी यांनी मला काँग्रेसमध्ये थांबण्यास आग्रह केला होता. ते म्हणाले तुम्ही या दिल्लीला मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुमचं नाव घोषित करतो. पण मी त्यांना सांगितलं की मी शरद पवार साहेबांसोबत आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झालो, पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाले," असे भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT