Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ नाराज? सुनील तटकरेंनंतर गिरीश महाजन भेटीला

Nashik Lok Sabha : भुजबळांची भेट घेणारे भाजप नेते गिरीश महाजन यांनी देखील कोणतीही नाराजी नाही. नाराजी असण्याचे काहीही कारण नाही भुजबळ यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सभेत भाषण केले आहे, असे म्हटले आहे.
Girish Mahajan meet Chhagan Bhujba
Girish Mahajan meet Chhagan Bhujbasarkarnama

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीतील पाच टप्प्याचे मतदान चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारात नाशिक आणि दिंडोरी मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अतिशय चुरशीची लढत आहे. यामध्ये अद्याप महायुतीतील काही पक्षांचे नेते सक्रिय नाही, अशा तक्रारी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक मतदारसंघातून इच्छुक असलेले मात्र उमेदवारी न मिळालेले छगन भुजबळ हे देखील नाराज असल्याच्या अशा चर्चा आहेत.

Girish Mahajan meet Chhagan Bhujba
Shrikant Shinde News : मुख्यमंत्र्यांच्या सत्तेची कमाल; डाॅ. श्रीकांत शिंदेंच्या संपत्तीत 669 टक्के वाढीची धमाल!

राष्ट्रवादी काँग्रेस NCP अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी (ता.16) पक्षाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची चर्चा करत प्रचारात सक्रिय होण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांच्या निवासस्थानी भुजबळांशी चर्चा केली. त्या पाठोपाठ आज (शुक्रवारी) भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी देखील भुजबळ यांची आज भेट घेतली. त्यामुळे भुजबळ नाराज आहेत? त्यांची नाराजी काय आहे? असे प्रश्न विचारले जात आहेत. त्यावर भुजबळ यांनी स्वतःच खुलासा केला आहे. आपण नाराज नाही, असे भुजबळ यांनी सांगितले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Girish Mahajan meet Chhagan Bhujba
Devendra Fadnavis News : अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाबाबत 'मातोश्री'त नेमकं काय घडलं?फडणवीसांनी सांगितली 'अंदर की बात'

भुजबळांच्या स्मितहास्याचा अर्थ काय?

भुजबळांची भेट घेणारे भाजप नेते गिरीश महाजन यांनी देखील कोणतीही नाराजी नाही. नाराजी असण्याचे काहीही कारण नाही भुजबळ यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सभेत भाषण केले आहे. विविध प्रश्न उपस्थित केले आहे. पंतप्रधान मोदी यांना पुन्हा पंतप्रधान का करायचे? हे सांगितले आहेत. चारशे जागा आवश्यक कशा हे मांडले आहे. त्यामुळे आता कशाची नाराजी असणार. कोणतीही नाराजी नाही. महाजन हे स्पष्टीकरण देत असताना भुजबळ शेजारी उभे होते. महाजन बोलत असताना ते स्मित करीत होते.

दीड तास चर्चा

भुजबळ नाराज नाही असे वारंवार सांगितले जात आहे. मग त्यांना भेटण्यासाठी नेत्यांची धावपळ का होते आहे? अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. गिरीश महाजन यांना भुजबळ यांचे भेट घेण्याची गरज का वाटली. दीड तास त्यांच्यात काय खलबते झाली असावे. याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com