Devendra Fadnavis-Eknath shinde Sarkarnama
मुंबई

Fadnavis Gift To Shinde : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंना गिफ्ट; दरे गावात महत्वपूर्ण प्रकल्पाची घोषणा

Maharashtra Budget 2026 : देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात शेतकरी, उद्योग व आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या. साताऱ्यातील दरे येथे Eknath Shinde यांच्या गावाजवळ निसर्गोपचार केंद्र उभारण्याची घोषणा केली.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 06 March : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीपासून उद्योग आणि पायाभूत सुविधांपासून आरोग्याच्या सुविधा वाढविण्याबाबत महत्वपूर्ण घोषणा त्यांनी केल्या. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खूश करताना त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे गावाच्या परिसरात निसर्गोपचार केंद्र उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केला.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. त्या अर्थसंकल्पात फडणवीस यांनी सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. तसेच, आरोग्याचा रोडमॅपही त्यातून दाखवून दिला आहे.

फडणवीस म्हणाले, राज्यातील नागरिकांसाठी सुलभ, किफायतशीर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेची सुनिश्चितता करणे. त्याद्वारे नागरिकांचे सरासरी आयुर्मान वाढविणे, यासाठी आरोग्य सेवांचा विस्तार करून ती शेवटच्या टप्प्यातील नागरिकांपर्यंत पोचविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. विशेषज्ञ आरोग्य सेवा आणि संशोधनासाठी परिसंस्था म्हणून मेडिसिटीज्‌ स्थापन करण्यात येणार आहेत.

प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय आरोग्य सेवांचा विस्तार करण्याचे सरकारने नियोजन आहे. ताणतणाव, जीवनशैलीजन्य आजार, मानसिक आरोग्य, तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी सातारा जिल्ह्यातील दरे (Dare) परिसरात निसर्गोपचार केंद्र उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली.

ग्रामीण भागातील नागरिकांची दरवर्षी होणार तपासणी

मुंबई परिसरात वैधिज्ञान आणि संगीत परंपरेवर आधारित वेलनेस उत्कृष्टता केंद्र विकसित करण्यात येईल. कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यासारख्या आजाराचे लवकर निदान व्हावे, यासाठी आशियाई विकास बॅंकेच्या मदतीतून ग्रामीण भागात दरवर्षी तपासणी मोहिम राबविण्यासाठी चार हजार पाचशे कोटी रुपयांची प्रगती योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT