Pandharpur Politic's : मोठी बातमी : पंढरपुरात परिचारक-अभिजीत पाटील एकत्र येणार; वरिष्ठ पातळीवरून हलली सूत्रे, सत्तावाटपही ठरलं!

Panchayat Samiti Sabhapati Election : प्रशांत परिचारक आणि आमदार अभिजीत पाटील पंढरपूर पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडणुकीपूर्वी एकत्र येण्याची चर्चा आहे. या आघाडीमुळे तालुक्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
prashant paricharak- Abhijeet Patil
prashant paricharak- Abhijeet PatilSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 06 March : पंढरपूर पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा तालुक्यात मोठी घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत. त्याबाबत थेट वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलिवण्यात आल्यामुळे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजीत पाटील हे दोन्ही मातब्बर नेते एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. तालुक्यातील परिचारक-पाटील हे दोन महत्वाचे नेते एकत्र आले तर तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यताही या निमित्ताने वर्तवली जात आहे.

दरम्यान, येत्या 12 मार्च रोजी पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींची निवड होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) आणि आमदार पाटील गट एकत्र आले तर सत्तावाटप कसे होणार, या निवडीकडे आणि राजकीय घडामोडींकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये पंढरपुरात (Pandharpur) भाजला मोठा फटका बसला. तर राष्ट्रवादी काॅंग्रेसने घवघवीत यश मिळवत पंचायत समितीमध्येही बाजी मारली. पंचायत समितीच्या 16 जागांपैकी 8 जागा परिचारक विरोधी गटाला मिळाल्याने पंचायत समिती सभापती उपसभापती निवडीचा पेच निर्माण झाला आहे.

दरम्यान कासेगाव गणातून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एक तर भगीरथ भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा एक उमेदवार निवडून आला आहे. तर सहा ठिकाणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (अभिजीत पाटील गट) उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे पंचायत समितीत निम्मे निम्मे संख्याबळ झाले आहे. दोन्ही गट तटस्थ राहिले तर सभापती आणि उपसभापतीची निवड ईश्वर चिठ्ठीद्वारे केली जाऊ शकते.

भाजपने सभापतिपदासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून एकमेकांच्या विरोधात लढलेले भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस (अभिजीत पाटील गट) एकत्र येणार अशी चर्चा सुरु झाली आहे. वरिष्ठ पातळीवरुनच परिचारक आणि अभिजीत पाटील यांच्यामध्ये ऐकोपा घडवून आणल्याचीही चर्चाही या निमित्ताने सुरु झाली आहे. परिचारक - आमदार पाटील गट एकत्र आले तर तालुक्यातील राजकीय गणिते पुन्हा बदलण्याची शक्यता आहे. आमदार अभिजीत पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला तर भगीरथ भालके यांची भूमिका काय राहणार याचीही चर्चा सुरु झाली आहे.

prashant paricharak- Abhijeet Patil
Satara Politic's : अविनाश मोहितेंनी ‘कृष्णा’साठी डाव टाकला : नेतृत्वाची धुरा बदलणार; सत्ताधारी भोसले गटही सावध

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसची नैसर्गिक युती आहे. त्याप्रमाणे पंढरपुरातही भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने एकत्र येण्याच्या सूचना राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आमदार अभिजीत पाटील यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णाय घेतल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान याबाबत राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांनी कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.

पहिली अडीच वर्षे भाजपकडे सभापतिपद

पंढरपूर पंचायत समितीचे सभापतीपद हे अनुसूचीत जातीसाठी राखीव आहे. परिचारक गटाकडून खर्डी गणातून शुभम आगावणे हे निवडून आले आहेत. सभापतिपदासाठी आगावणे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तर उपसभापतिपदाची संधी कोणाला मिळणार याचीही उत्सुकता शिगेला पोचली आहे.

prashant paricharak- Abhijeet Patil
मोठी अपडेट : राज्यात पुन्हा निवडणुकींचा धुरळा! निवडणूक आयोगाच्या हालचालींनी वातावरण तापले; घोषणेकडे लक्ष?

पहिली अडीच वर्षे सभापती आणि उपसभापती दोन्ही भाजपकडे देण्यावर दोन्ही गटाचे एकमत झाल्याचे ही समजते. नंतरची अडीच वर्षे अभिजीत पाटील यांच्या गटाला संधी दिली जाणार अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान याबाबत अधिक माहितीसाठी आमदार अभिजीत पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com