CM Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation : जरांगे पाटलांची तब्येत खालावली; मुख्यमंत्री शिंदे मोठा निर्णय घेणार ?

Manoj Jarange Patil Hunger Strike : मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून उपोषण सुरु केले असून त्यांची प्रकृती खालावली आहे.

Ganesh Thombare

Mumbai News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित असणार आहेत. त्यामुळे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून उपोषण सुरु केले असून त्यांची प्रकृती खालावली आहे. तर राज्य सरकारने 'सगेसोयरे' या संदर्भात काढलेल्या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करावी, यासह मराठा आंदोलनावेळी दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे, यासह आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाला आज सात दिवस झाले आहेत. त्यामुळे जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे. मात्र, तरीही जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय़ घेतं, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं ?

राज्य सरकार मराठा समाजाला दिलासा देण्याची शक्यता आहे. या संदर्भात 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन सरकारने बोलावलं असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात काही महत्वाचा निर्णय होतो का ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगातर्फे मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. राज्य मागासवर्ग आयोगामार्फत जवळपास 2 कोटी 48 लाख कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आलं असून आता आयोगाच्या अहवाल नेमका काय असेल ? हे देखील लवकरच स्पष्ट होईल.

Edited By-Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT