Dhangar Reservation : युवक चढले तब्बल दोनशे फूट टॉवरवर; प्रशासनाची प्रचंड धावपळ

Youth Protest : प्रकृती खालावल्याने प्रशासनाने राबविले ‘रेस्क्यू ऑपरेशन’
Protest For Reservation at Buldhana
Protest For Reservation at BuldhanaSarkarnama
Published on
Updated on

Dhangar Reservation : एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असताना आता धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून धनगर समाजाचे दोन युवक तब्बल दोनशे फूट टॉवरवर चढत अन्नत्याग आणि अर्धनग्न आंदोलन करीत होते. या दोन्ही युवकांना प्रशासनाने आपत्कालीन बचाव पथकाच्या मदतीने खाली उतरविले आहे. आपत्कालीन पथकाकडून हे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ राबविण्यात आले.

मराठा आरक्षणाची मागणी तीव्र होत असतानाच धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणीही आक्रमक वळणावर आली आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी यशवंत सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष गजानन बोरकर व जिल्हा उपाध्यक्ष नवनीत सोनाळकर या दोन युवकांनी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथील टॉवरवर चढून अर्धनग्न व अन्नत्याग सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसांपासुन या युवकांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. धनगर समाजातील मुले शिक्षण घेऊनही आरक्षण मिळत नसल्याने शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहत आहेत, असा त्यांचा आरोप आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Protest For Reservation at Buldhana
Buldhana Sanjay Kute Politics : खासदारांसमोर घडलेल्या मानापमान नाट्यानंतर भडकले आमदार कुटे !

सरकारकडून धनगर समाजावर नेहमीच अन्याय करण्यात आल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. राज्य सरकार इतर समाजाबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करीत आहे. मात्र धनगर समाजाला अद्यापही अनुसूचित जातीचे आरक्षण मिळाले नसल्याचा आरोप करीत दोन युवकांनी बुलढाणा जिल्ह्यातील लाखनवाडा येथे 200 फूट टॉवर चढून आंदोलन सुरू केले होते. नवनीत सोनाळकर आणि गजानन बोरकर या दोघांनी टॉवर वर चढून अन्नत्याग आणि अर्धनग्न आंदोलन सुरू केलेल्या या आंदोलनानंतर दोघांची प्रकृती खालावली होती. आंदोलन चिघळू नये म्हणून प्रशासनाने या आंदोलनात सहभागी युवकांना खाली उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पुढाकार घेत 14 फेब्रुवारीला अकोला येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर बचाव पथकाने टॉवरवर चढून उपोषणकर्त्यांसोबत चर्चा सुरू केली. त्यांचे समुपदेशन करण्यात आले. ‘रेस्क्यू ऑपरेशन’ राबवित आंदोलन करीत असलेल्या दोन्ही तरुणांना अखेर खाली उतरविण्यात आले. या युवकांना खाली आणण्यासाठी पथकाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

Protest For Reservation at Buldhana
Buldhana Scam : शेळी, बोकड वाटपात लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचे हात ओले

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात धनगर समाजाचा आरक्षणासाठी लढा सुरू आहे. यासाठी गेल्या 15 दिवसांपासून धनगर समाजाचा युवक नंदू लवंगे यांने जिल्हाधिकारी कार्यलयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. परंतु कोणताही निर्णय न झाल्याने तीन दिवसांपूर्वी धनकर समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे सातत्याने धनगर समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Protest For Reservation at Buldhana
Buldhana Politics : राजकारण तापले! तुपकर म्हणाले, कानाखाली आवाज काढण्याच्या पांचट धमकीकडे लक्ष देत नाही!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com