Dada Bhuse Sarkarnama
मुंबई

Dada Bhuse : शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे शिकवणार इंग्रजी शाळांना मराठीचा 'धडा'

Marathi Mandatory in Central Board English Schools : मराठी भाषेच्या अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना मराठी भाषेचे संपूर्ण ज्ञान असायलाच हवे, शाळांत आता मराठी विषय शिकवण्याबाबत शाळांकडून चालढकल सहन केली जाणार नाही.

Mangesh Mahale

Maharashtra Education News: राज्यातील सर्वच केंद्रीय मंडळाच्या इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकविणे बंधनकारक आहे. पण राज्याच्या या आदेशाला अनेक इंग्रजी शाळांनी केराची टोपली दाखवली आहे. पण आता अशा शाळांना शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हातात छडी घेऊन मराठीला विरोध करणाऱ्या इंग्रजी शाळांना 'धडा' शिकवण्याच्या तयारी आहे, अशा इशारा त्यांनी या शाळांना दिला आहे.

'मराठी'ला डावलण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा शाळांना आता पळ काढणं अशक्य असल्याचे दिसते. मराठी सक्तीचा आदेश न पाळणाऱ्या शाळांवर कडक कारवाई करणार असल्याचे भुसे यांनी आज माध्यमांना सांगितले. आज मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिला आहे.

मराठी भाषेच्या अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना मराठी भाषेचे संपूर्ण ज्ञान असायलाच हवे, शाळांत आता मराठी विषय शिकवण्याबाबत शाळांकडून चालढकल सहन केली जाणार नाही, असे सज्जड दम दादा भुसे यांनी इंग्रजी शाळांना दिला आहे.

नव्या अभ्यासक्रम आराखड्यात मराठी हा विषय पर्यायी करण्यात आल्याची चर्चा रंगली होती. आता शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मराठी अनिवार्यच अशी भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक असणार आहे. शालेय शिक्षण विभागाचा रोडमॅप लवकरच तयार केला जाईल, असे दादा भुसे म्हणाले. शालेय शिक्षण विभागाबद्दल काही महत्त्वाच्या सूचना दादा भुसे यांनी प्रशासनाना दिल्या आहे.

दादा भुसे म्हणाले...

मराठी भाषेला केंद्राकडून अभिजात ही दर्जा मिळाला आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक आहे. मात्र तरी काही शाळा यातून पळवाट काढत आहेत. अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. आता राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचा कायदा करण्यात आला आहे. यामुळे खासगी, सीबीएससी,आयसीएससी किंवा कोणत्याही इंग्रजी बोर्डाच्या शाळांना हा नियम लागू असणार आहे. नियम न पाळणाऱ्या शाळांवर कडक कारवाई करण्यात येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT