Ajit Pawar, Jitendra Awhad, Sunil Tatkare Sarkarnama
मुंबई

Mumbra-kalwa : आव्हाडांचा बंदोबस्त करण्यासाठी अजितदादांनी काढला 'हुकमी एक्का'; खासदार तटकरेंनी नावही सांगितलं

Ajit Pawar Vs Jitendra Awhad : 'कळव्यातील पीचवर फलंदाजाला बाद करण्याचे कौशल्य नजीब मुल्ला यांच्याकडेच', खासदार सुनील तटकरे यांचे सूचक विधान

Pankaj Rodekar

Thane News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले नजीब मुल्ला यांनी कळवा-मुंब्रा विधानसभेच्या विकासासाठी येथून निवडणूक लढविण्याचे संकेत नुकतेच दिले. आता चोवीस तासांतच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनीही यासंदर्भात आता मोठे भाष्य केले आहे.

'कळव्यातील पीचवर चांगल्या फलंदाजाला चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद करण्याचे कौशल्य नजीब मुल्ला यांच्याकडे आहे,' असे सूचक विधान खासदार सुनील तटकरे यांनी केले. याशिवाय नजीब मुल्ला व आनंद परांजपे या जोडगोळीच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. त्यामुळे कळवा-मुंब्रा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी नजीब मुल्ला यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आव्हाडांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने 'हुकमी एक्का' काढल्याचं बोललं जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे पार पडलेल्या "नजीब मुल्ला ट्रॉफी 2024" क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस समारंभात खासदार सुनील तटकरे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व्यासपीठावर उपस्थित होते.

तटकरे म्हणाले, महाराष्ट्र विधान परिषदेचे उपाध्यक्ष व ठाणे जिल्ह्याचे नेते वसंत डावखरे यांच्या काळात दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये मी आलो होतो. यावेळी येथे मोठ्या प्रमाणात टेस्ट मॅचेस होत असत. पण आमचे प्रदेश सहकारी नजीब मुल्ला यांनी पहिल्यांदाच या स्टेडियमवर टेनिस स्पर्धा 'आयपीएल'च्या धर्तीवर भरवून सर्वसामान्य तरुण क्रिकेटपटूंना स्टेडियमच्या भव्य वास्तूत खेळण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.

नजीब मुल्ला हे राजकारणात, समाजकारणात यशस्वी झाले असून धर्मनिरपेक्ष विचारांचे पाईक आहेत. बॅडपीचवर यशस्वी फलंदाजाला यष्टिचित करण्याचा त्यांना चांगलाच अनुभव आहे. यामुळे कळव्यातील पीचवरही चांगल्या समजल्या जाणाऱ्या फलंदाजाला चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद करण्याचे कौशल्य मुल्ला यांच्याकडे आहे, अशी फटकेबाजी करीत तटकरे यांनी सूचक विधान केले.

(Edited By : Ganesh Thombare)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT